शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

दोघांचा खुन केल्याप्रकरणी आरोपीला ७ वर्ष सक्तमजुरी

By admin | Published: April 02, 2017 2:59 AM

केडगांव (ता. दौंड) येथे साधुचा वेष धारण करुन मठातील सोन्याच्या चोरीसाठी दोघांचा खुन केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश आर.बी. देशपांडे

बारामती: केडगांव (ता. दौंड) येथे साधुचा वेष धारण करुन मठातील सोन्याच्या चोरीसाठी दोघांचा खुन केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश आर.बी. देशपांडे यांनी ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.अशोक देवेंद्र शिंदे उर्फ भरतनाथ (वय २५, रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) असे आरोपीचे नाव आहे.केडगाव येथे २० आॅगस्ट २०११ रोजी सदगुरु चौरंगनाथ महाराज ट्रस्टच्या नवनाथ मंदीरात हा प्रकार घडला. या बाबत संतोष गजानन जाधव (वय २८, रा. चौरंगीनाथ महाराज मठ,केडगाव ) यांनी पोलीसात फिर्याद दिली. आरोपी भरतनाथ याने मठातील सोन्याचांदीचे दागिने चोरण्यासाठी साधुचा वेष घेतला. तसेच वेश घेउन मठात प्रवेश मिळविला. मठातील महंत गोविंद रामा रासकर उर्फ अविनाथजी गुरुचौरंगीनाथजी महाराज (वय ७५, रा. वाघुंडे, ता. पारनेर, जि .अहमदनगर) ,त्यांचे शिष्य शरद मल्हारी मुळीक (वय ५०, रा गलांडवाडी, ता .दौंड) यांच्यामुळे सोनेचोरी करणे शक्य नव्हते. त्यामुळे आरोपीने महंत आणि त्यांच्या शिष्याला मारण्याचा कट रचला. मठातील स्वयंपाक खोलीत त्याने थायमेट हे विषारी औषध दुधात मिसळले. हे दुध पिल्याने महंत व त्यांच्या शिष्याचा मृत्यु झाला. हे विषारी दुध पिल्याने चार मांजरे देखील मृत्युमुखी पडली. आरोपी भरतनाथ याच्या हाती मात्र सोने लागले नाही. घटनेनंतर तो केडगांव येथील रेल्वे पुलाखाली लपला. पोलीस तपासात तो सापडला. त्याच्याकडे थायमेट, बँकेचे पासबुक सापडले. त्याच्यावर २२ आॅगस्ट २०११ रोजी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक बी. डी. कोपनर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी आठ साक्षीदार तपासले.