कुमार नानाभाऊ कोकणे (वय ३५) याने शिनोली येथील महिला घरात एकटीच असताना गैरवर्तन केले. तसेच संबंधित गोष्टीची माहिती पतीला सांगितल्यास गावातील लोकांना सोशल मिडीयावर तुझे फोटो टाकुन तुझी बदनामी करील अशी धमकी दिली. याबाबत संबंधित महिलेने घोडेगाव पोलीस ठाण्यात कोकणे विरोधात तक्रार दिली होती.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे, पोलीस उपनिरीक्षक लहु शिंगाडे यांनी आरोपीला पकडण्यासाठी पोलीस नाईक दत्तात्रय जढर, अविनाश कालेकर, संदिप लांडे यांचे एक पथक तयार केले. या पथकाने संबंधित फरार आरोपीचा सर्वत्र शोध घेतला. अखेर मोबाईल लोकेशनवरून आरोपी मुंबई येथे असल्याचे निदर्शनास आले. पथकातील दत्तात्रय जढर, अविनाश कालेकर यांनी मुंबईत जावून आरोपीला ताब्यात घेतले. या कामी मुंबई पोलिसांची मदत झाली.
शिनोली येथील विनयभंग प्रकरणातील आरोपी समवेत सहाय्यक पोलिस निरीक्षक लहु थाटे व पोलिस कर्मचारी