पुणे : एका सॉफ्टवेअर कंपनीत ओळख झालेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. ती गर्भवती राहिल्याने लग्नासाठी आग्रह धरल्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी दिलेल्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला.
सोमनाथ मारुती गोदे (वय ३६, रा. चिखली) असे जामीन फेटाळण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ३२ वर्षीय तरुणीने देहू रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सप्टेंबर २०१८ ते जून २०२१ दरम्यान चिखलीत हा प्रकार घडला. संबंधित तरुणी ही सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करते. एका मॅरेज ब्युरोमधून तिची गोदेबरोबर ओळख झाली. त्यानंतर याने तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्यातून तरुणी गरोदर राहिली होती. तरुणीने लग्नाची मागणी केल्यानंतर त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणीने गोदेविरोधात फिर्याद दिली होती. तक्रार झाल्यानंतर गोदे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तरुणीच्या वतीने अॅड. मंगल मायनाळ यांनी न्यायालयात बाजू मांडली.
--------------------