राजगुरुनगर : विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगल्याबद्दल मयूर जयसिंग गायकवाड (वय २४, रा. टेल्को कॉलनी नंबर २, राजगुरुनगर, ता. खेड) यास खेड पोलीसांनी शनिवारी (दि. २२) रंगेहाथ पकडले. आरोपीविरोधात खेड पोलीस ठाण्यात गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांंना दूरध्वनीवरुन एक व्यक्ती गावठी पिस्तुलाने वाडा रस्त्यावरील पाण्याची टाकी चौकात रिक्षावाला व पथारीवाले यांना धमकावत आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस हवालदार आर के नलावडे, एस आर मांडवे, व्ही जे पाटील, एस जे बनकर आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गायकवाड त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २०,००० रुपये किंमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तुल व एक जिवंत काडतूस मिळुन आले. पोलीस नाईक राजेश नलावडे यांनी खेड पोलीस ठाण्यात गायकवाड विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ............स्थानिक गुन्हे शाखेने तौसिक शेख व अमर शेवाळे यांना राजगुरुनगर परिसरात गावठी पिस्तूलासह नुकतेच पकडले होते. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी या परिसरात काहींना पिस्तुल विक्री केल्याचे सांगितले. गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याने शेवाळे याच्याकडून दहा हजारांना पिस्तुल विकत घेतले होते. राजगुरुनगर परिसरात अनेकांकडे गावठी पिस्तुले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लवकरच त्यांना सर्व आरोपींना तडीपार करून मोक्का लावणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
खेडमध्ये गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 8:07 PM
विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगल्याबद्दल मयूर जयसिंग गायकवाड (वय २४, रा. टेल्को कॉलनी नंबर २, राजगुरुनगर, ता. खेड) यास खेड पोलिसांनी शनिवारी (दि. २२) रंगेहाथ पकडले.
ठळक मुद्दे२०,००० रुपये किंमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तुल व एक जिवंत काडतूस जप्त