शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

जैन धर्माच्या प्रसारासाठी आचार्य विद्यासागर यांचे बहुमोल योगदान

By admin | Published: July 02, 2017 1:57 AM

जैन धर्माचा प्रचार व प्रसारामध्ये आचार्य विद्यासागरजी महाराजांचे बहुमोल योगदान आहे. विसाव्या शतकात आचार्य शांतीसागरजी महाराज व

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : जैन धर्माचा प्रचार व प्रसारामध्ये आचार्य विद्यासागरजी महाराजांचे बहुमोल योगदान आहे. विसाव्या शतकात आचार्य शांतीसागरजी महाराज व एकविसाव्या शतकात आचार्य विद्यासागरजी महाराजांनी जैन धर्माची परंपरा अखंडपणे पुढे नेण्याचे काम समर्थपणे केले आहे, असे प्रतिपादन प. पू. १०८ पुलकसागरजी महाराज यांनी केले. आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराजांच्या मुनी दीक्षेस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बारामतीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या निमित्ताने विद्यासागर महाराजांच्या प्रतिमेची शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या प्रसंगी श्री महावीर भवन येथे झालेल्या कार्यक्रमात प. पू. पुलकसागरजी महाराजांनी विद्यासागर महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. विद्यासागरजी महाराजांचे जैन धर्मियांमधील एक सजीव तीर्थ अशा शब्दात त्यांनी गौरव केला. आपल्या आचरणातून जैन धर्म म्हणजे नेमका काय, हे त्यांनी सिद्ध केले. विसाव्या शतकात आचार्य शांतीसागरजी महाराजांनी तर एकविसाव्या शतकात विद्यासागरजी महाराजांनी जैन धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी देशभर भ्रमंती केली. मुनी परंपरा अधिक समर्थपणे पुढे सुरू ठेवण्यात त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे पुलकसागरजी महाराजांनी नमूद केले. शुभांगी कोठारी यांनी मंगलाचरण करून कार्यक्रम सुरू केला. स्मिता दोशी यांनी विनयांजली अर्पण केली. जयकुमार वडूजकर व सुकुमार कोठारी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष वालचंद संघवी, सचिव अजित वडूजकर, खजिनदार भारत खटावकर, जवाहर वाघोलीकर, किशोर सराफ, संजय संघवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.