निगडाळे (ता. आंबेगाव) येथे 'जागतिक आदिवासी दिन' व 'क्रांती दिन' उत्साहात साजरा आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोहकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे या होत्या. सुरुवातीला 'एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान', 'जय जोहार, जय आदिवासी', 'वनवासी नही हम आदिवासी हैं, इस देश के मूलनिवासी हैं', 'आमची संस्कृती आमचा अभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान', 'जय बिरसा,जय राघोजी' आदी घोषणा देत बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेसह प्रभातफेरी काढण्यात आली. यानंतर शाळेत छत्रपती शिवाजी महाराज, आदिवासी लोकनायक व आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा, राघोजी भांगरे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक बबन कोंढवळे, शंकर कुऱ्हाडे, मारुती तळपे, ग्रामसेवक अशोक शेवाळे, युवा नेते जितेंद्र गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैभव लोहकरे, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष विनायक लोहकरे, मुख्याध्यापक संतोष थोरात, शिक्षिका अलका गुंजाळ,शंकर भवारी,दत्तात्रय लोहकरे, विद्यार्थी व आदिवासी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी आदिवासी नेते मारुती तळपे, जितेंद्र गायकवाड, संतोष थोरात यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व, आदिवासींच्या परंपरा, संस्कृती,देवदेवता,वेशभूषा,आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा,राघोजी भांगरे व इतर आदिवासी क्रांतिकारकांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आदी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संयोजन उमेश लोहकरे, नीलेश लोहकरे,तुषार लोहकरे,ज्ञानेश्वर लोहकरे,शशी भवारी,राजू कोकाटे,सुनिल कुऱ्हाडे, तुषार गेंगजे, रामदास कुऱ्हाडे, संतोष लोहकरे यांनी केले.
युवा नेते जितेंद्र गायकवाड यांनी प्रास्तविक केले व आभार शिक्षिका अलका गुंजाळ यांनी मानले.
निगडाळे (ता. आंबेगाव) येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रतिमापूजन प्रसंगी शालेय विद्यार्थी,महिला व ग्रामस्थ.
तळेघर वार्ताहर
संतोष जाधव