पुणे : शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पालिकेने रुग्णवाहिका आणि शववाहिका वाढविण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या ४६ रुग्णवाहिकांसोबत पालिकेने ५५ खासगी रुग्णवाहिकांची सेवा अधिग्रहित केली आहे. यामध्ये २३ शववाहिका आणि ७८ रुग्णवाहिकांचा समावेश आहे.
रुग्णांना दवाखान्यात पोचविण्याकरिता वापरात असलेल्या ७८ रुग्णवाहिकांपैकी ऑक्सिजन सुविधा असलेल्या ६३ रुग्णवाहिका आहेत. कोविड-१९ करीता (बाणेर कोविड सेंटर, कोविड केअर सेंटर, विलगीकरण कक्ष इत्यादी) ६७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. पालिका रुग्णालये व
दवाखान्यासाठी (नॉन कोविड रुग्णाकरीता) ११ रुग्णवाहिका कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत.
शहरामधील आयसोलेशन सेंटर, कोविड सेंटर व विविध रुग्णालयांमधील रुग्ण व नागरिकांना रुग्णवाहिकेची आवश्यकता भासल्यास पालिकेच्या कोविड-१९ नियंत्रण कक्षाशी तसेच शासनाच्या १०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रुग्णांच्या वाहतुकीसाठी ऑक्सिजन सुविधा असलेल्या ५६ रुग्णवाहिका २४ तास कार्यरत ठेवल्या आहेत. खाटांची आवश्यकता असल्यास बेड व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून खाटांच्या उपलब्धतेबाबत मागणी नोंदवावी.
आयसोलेशन, कोविड सेंटर, विविध रुग्णालये येथील तसेच शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी शववाहीका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचे नियंत्रण व नियोजन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या नियंत्रण कक्षामधून केले जात आहे.
-------
रुग्णवाहिकेसाठी येथे संपर्क साधा
नियंत्रण कक्ष : ९६८९९३९३८१
शासकीय रुग्णवाहिका : १०८
-------
शववाहिकेसाठी येथे संपर्क साधा
९६८९९३९६२८
९०११०३८१४८
०२०-२४५०३२११
०२०-२४५०३२१२
--------
खाटांच्या उपलब्धतेसाठी संपर्क
०२०-२५५०२११०