पुणे : निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर नियमांचे उल्लंघन करून बस चालविणाऱ्या २६ चालकांवर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ने दंडात्मक कारवाई केली आहे. प्रामुख्याने मार्गावरील सिग्नलचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई झाली. काही दिवसांपुर्वीच निगडी ते दापोडी हा बीआरटी मार्ग सुरू झाला आहे. बस संचलनाचे परीक्षण करताना या मार्गावर काही बसचालक नियमबाह्य पद्धतीने बस चालवित असल्याचे निदर्शनास आले. दि. १३ सप्टेंबर रोजी ही पाहणी करण्यात आली. त्यामध्ये २६ चालक सिग्नल यंत्रणेचे उल्लंघन करताना आढळले. त्यानुसार पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्या आदेशावरून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पीएमपी तसेच भाडेतत्वावरील बसचालकांचाही यात समावेश आहे. बीआरटी मार्गावरील बस वाहतुक सुरळीत होण्यासाठी यापुढेही अशाप्रकारची कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. -------------------
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीच्या २६ चालकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 8:57 PM
निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर नियमांचे उल्लंघन करून बस चालविणाऱ्या २६ चालकांवर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ने दंडात्मक कारवाई केली आहे.
ठळक मुद्देपीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्या आदेशावरून संबंधितांवर दंडात्मक कारवाईबीआरटी मार्गावरील बस वाहतुक सुरळीत होण्यासाठी यापुढेही अशाप्रकारची कारवाई केली जाणार