उरुळीकांचनमध्ये बाधितांची संख्या वाढत चालली आहे. कडक निर्बंध लागू करूनही काही जण विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहे. यामध्ये होम क्वारंटाइन केलेली बिनदिक्कतपणे बाहेर पडत असल्याचे समोर आले आहे. या बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यांच्यावर आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने कारवाई करावी अशी मागणी उरुळी कांचन सुजाण नागरिक संघाने केली आहे. दरम्यान, प्रशासनाने काही अटींवर व्यापाऱ्यांना दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र, तरीही त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उरुळी कांचन पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणार्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भाजी विक्रेते, किराणा दुकानदार अशा सुमारे ५० जणांवर पोलिसांनी कारवाई करून २१ हजार ६०० रुपये दंड वसूल केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांनी दिली. या कामात त्यांना सदाशिव गायकवाड, पोलिस हवालदार, बाबुराव कुरे, भारती होले, अमीर शेख, अमोल भोसले, महेंद्र गायकवाड, आजिर माने, होमगार्ड चव्हाण, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, सोमनाथ बगाडे, प्रशांत गायकवाड ,महेश धर्माधिकारी,प्रथमेश ढवळे यांनी सहकार्य केले. यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे दादाराजे पवार यांनी केले आहे.
१९ उरुळी कांचन