पुणे: आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या आणखी एका बुकीवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनकवडी परिसरात मंगळवारी (ता. 28) ही कारवाई करण्यात आली. राहुल सुभाष पांडे (वय 48, रा. खडकमाळ आळी घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्या बुकीचे नाव आहे. त्याच्या घरातून 51 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहकारनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान धनकवडीतील एका घरामध्ये आयपीएलवर सट्टा घेत घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने धनकवडी येथील हिल व्ह्यू सोसायटीतील बी 101 या घरावर छापा टाकला. यावेळी त्यांना आतमध्ये कोलकत्ता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यावर ऑनलाइन बुकिंग घेतले जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी बुकी असलेल्या राहुल पांडेला अटक केली.
TET Exam: 'टीईटी’ परीक्षेच्या ताखेत पुन्हा बदल
पोलिसांनी त्याच्या घरातून मोबाईल, लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण 51 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक घाडगे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पुणे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी आयपीएल मधील क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय बुकींना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून तब्बल 92 लाख रुपये हस्तगत करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी राहुल पांडे या आणखी एका बुकीला अटक केली आहे.