पिंपरी : रुग्णाला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यास सहकार्य करीत नाही. याचा जाब विचारण्यास गेलेल्या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याशी उद्धट वर्तणूक केल्याप्रकरणी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या दोन अधिकाºयांसह एका बाऊन्सरविरुद्ध शनिवारी वाकड पोलिसांकडे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या अधिकाºयांवर अशा प्रकारे कारवाई होण्याची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत मधुकर गायकवाड (वय २९, रा. ठाणे, मुंबई) या स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाºयाने बिर्ला रुग्णालयाच्या अधिकाºयांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशासकीय अधिकारी शिल्पी व जनसंपर्क अधिकारी पवार या दोघांसह धक्काबुक्की करणाºया बाऊन्सरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात बालक दगावले. रुग्णालयाने कोटेशन देण्यास विलंब का झाला? याचा जाब विचारण्यास गेलेल्या स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी प्रशांत गायकवाड व त्यांचे सहकारी विक्रम कदम यांना शिल्पी व पवार यांनी माहिती न देता त्यांच्याशी उद्धट वर्तन केले. तेथील बाऊन्सरने धक्काबुक्की केली. त्यामुळे या तिघांविरोधात वाकड पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक रमेश केंगार याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.समर्थ सागर राणे या दहा महिन्यांच्या मुलाला १५ आॅगस्ट रोजी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या बालकाच्या कुटुंबीयांचे आर्थिक उत्पन्न बेताचे असल्याने त्यांनी शासकीय योजनेतून उपचार मिळावेत, अशी विनंती केली होती. त्यांना वैद्यकीय खर्चाचे कोटेशन मिळणे अपेक्षित होते. मात्र रुग्णालयाकडून वेळेत कोटेशन मिळू शकले नाही. तब्बल सात दिवसांनी रुग्णालयाने कोटेशन दिले.