पुणे : मार्केट यार्डातील फळविक्रेत्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. इतर दिवसांपेक्षा रविवारी मार्केट यार्डात जास्त गर्दी असते. त्यामुळे प्रत्येक व्यापाऱ्याने नियमांचे पालन करणे आवश्यक असते. मात्र, काही व्यापारी गाळ्याच्या पुढे क्रेट व इतर साहित्य ठेवतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
मोकळ्या जागेत ठेवलेले २३० क्रेट जप्त केले, तर दोन अडत्यांकडून प्रत्येकी दोन हजार ३६० रुपये आणि एका अडत्यांकडून एक हजार १८० रुपये दंड आकारण्यात आला.
मार्केट यार्डात इतर दिवसांच्या तुलनेत जास्त गर्दी होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. वस्तुतः व्यापाऱ्यांनी गाळ्याच्या १५ फूट आत व्यापार करणे बंधनकारक आहे. मात्र, हे व्यापारी नियमांचे उल्लंघन करून व्यापार करत होते. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली. फळ विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे, भाजीपाला विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर यांच्या नेतृत्वाखाली गटप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी ही कारवाई केली.