पुणे: वारजे माळवाडी परिसरात दहशत निर्माण करणा-या सराईताविरुद्ध एमपीडीए अॅक्टनुसार एक वर्ष स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. गंग्या उर्फ विकी विष्णू आखाडे (वय २४, रा. वारजे माळवाडी) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गंग्या उर्फ विकीविरूद्ध मागील पाच वर्षांत ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके आणि पोलीस निरीक्षक अमृत मराठे यांनी गंग्या उर्फ विकी विरोधात एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संघटित गुन्हेगारी, गुन्हेगारी टोळ्याविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार मागील सात महिन्यांत १९ गुन्हेगारांविरूद्ध एमपीडीए अॅक्टनुसार कारवाई क्ररण्यात आली आहे.
----