बारामती : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुला जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणुन घोषित केले आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सिनेमागृह,मॉलसह हॉटेल आदी व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.मात्र,जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलुन दुकाने सुरु ठेवणे काहीजणांना महागात पडले आहे. बारामती,इंदापुर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणुला जगभरातपसरलेला साथीचा आजार म्हणुन घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरूनपुणे शहरामध्ये व परिसरामध्ये परदेशातुन आलेले देशी विदेशी नागरीक,पर्यटक यामुळे विषाणुचा प्रादुर्भाव पसरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर आपत्ती व्यवस्थापन नियम २००५ व महाराष्ट्र पोलीसकायदा अधिकाराचा वापर करून आदेश दिले आहेत.त्यानुसार सर्व प्रकारचे सण,समारंभ, धार्मिक कार्यक्रम, उत्सव, मनोरंजनाचे कार्यक्रम, स्पर्धाकार्यक्रम व पाच किंवा पाचपेक्षा जास्त गर्दी जमेल अशा कार्यक्रमास मनाईकेली आहे. तसेच सिनेमागृह, मॉल, हॉटेल आस्थापना, परमिटरूम, बिअरबार,आॅनलाईन लॉटरी सेंटर, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाटयगृह, किडांगणे बंदठेवणबाबत आदेश दिले आहेत. या आदेशामधुन शासकीय निमशासकीय कार्यालय,सरकारी महामंडळाची आस्थापना, रूग्णालये, दवाखाना, पॅथालॉजी,रेल्वेस्टेशन, एसटीस्टॅन्ड, अत्यावश्यक किराणा दुकान, औषधालय यांनावगळण्यात आले आहे.मात्र,या आदेशाचे उल्लखंन केल्याने भारतीय दंड संहिता कलम १८८ व आपत्तीव्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये बारामती उपविभागात गुन्हे दाखल करण्यातआले आहेत. त्यानुसार सुर्यनगरी येथील एस. के. आर रेस्टॉरंन्टचे मालक वचालक, सुर्यनगरी मंडईकडे जाणाºया नेता प्राईड शॉप नंबर १२ चे मालक वचालक, इंदापूर- माउली हॉटेलचे समोरील चहाचे गाडयाचे मालक व चालक,इंदापुरयेथील हॉटेल स्वामीराजचे मालक व चालक,तसेच बारामती शहरातील एसआरएंटरप्रायझेसचे मालक व चालक, बॉम्बे स्टिल ट्रेडर्स मेखळी रोड, सिध्दकलासॅनिटरी वेअर अ?ॅन्ड प्लबिंग, बाबाजी ट्रेडर्स, वस्ताद पानशॉप पतंगशहानगरतसेच बारामती उपविभागात हॉटेल कडक झटका , पारस स्टिल अ?ॅन्ड होम यसेन्सव वालचंदनगर पो.ठाणे मध्ये २ गुन्हे दाखल करण्याची प्रकिया सुरूआहे.याशिवाय वालचंदनगर पोलीस ठाण्यात व्हॉटसअपद्वारे अफवा पसरविणाºयाअज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये. नागरीकांना अफवेची एखादीमाहिती मिळाल्यास पुढे प्रसारीत करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचाइशारा उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी दिला आहे.———————————
बारामती,इंदापुरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलुन दुकाने,हॉटेल सुरु ठेवणे पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 8:45 PM
जिल्हाधिकाऱ्यांनी सिनेमागृह,मॉलसह हॉटेल आदी व्यवसाय बंद ठेवण्याचे दिले आदेश
ठळक मुद्देआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल