शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

हेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 1:29 PM

हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीने हेल्मेटला कधीच विरोध केला नाही. पण....

ठळक मुद्देसक्ती कायम ठेवल्यास रास्ता रोको, निदर्शने, सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा इशारा पक्षभेद विसरून सर्वांनी हेल्मेट सक्तीविरोधात रस्त्यावर उतरावे

पुणे : हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीने हेल्मेटला कधीच विरोध केला नाही. पण पोलिसांकडून सक्तीचे भुत पुणेकरांच्या लादले जात आहे. नवीन अधिकारी आले की हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतात. हा निर्णय केवळ प्रसिध्दीसाठी घेतला जातो. सर्वसामान्यांचे मत जाणून घेतले जात नाही. त्यामुळे आता पहिल्यांदा पोलिसांना सक्तीविरोधात निवेदन दिले जाईल. त्यानंतरही सक्ती कायम ठेवल्यास रास्ता रोको, निदर्शने, सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने मंगळवारी दिला.पुणे पोलिसांकडून येत्या १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरूवात शहरात मंगळवारपासून करण्यात आली. हेल्मेट न घातलेल्या दुचाकीवरील सरकारी कर्मचाºयांवर कारवाई करण्यास पोलिसांनी सुरूवात केली. यापार्श्वभूमीवर हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीची बैठक आनंदऋषी ब्लड बँकेच्या आवारात झाली. या बैठकीला सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर शांंतीलाल सुरतवाला, मोहनसिंग राजपाल, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, भाजपाचे संदीप खर्डेकर, काँग्रेसचे संजय बालगुडे, शिवसेनेचे शाम देशपांडे, मनसेच्या रुपाली पाटील, रिपब्लिकन पक्षाचे मंदार जोशी, धनंजय जाधव, विश्वास चव्हाण, बाळासाहेब रुणवाल, गिरीश भिलारे, प्रफुल्ल देशमुख आदींनी सहभाग घेतला.

बैठकीमध्ये हेल्मेटसक्तीला तीव्र विरोध करण्यात आला. त्यानंतर पुढील रुपरेषा निश्चित करण्यात आली. पुढील एक-दोन दिवसांत पोलिसांना हेल्मेटसक्ती न करण्याबाबत निवेदन दिले जाईल. त्यानंतरही निर्णय न बदलल्यास चौका-चौकात निदर्शने, जाहीर सभा, रास्ता रोको आणि शेवटी सविनय कायदेभंग असे टप्प्याटप्याने आंदोलने केली जातील, अशी माहिती काकडे यांनी दिली. हेल्मेटसक्तीचे भुत पुणेकरांवर लादु नका, त्यासाठी दरवेळी आंदोलन करावे लागते. पुणेकरांचे स्वातंत्र्य हिरावून घेउ नका, असे सुरतवाला म्हणाले. पक्षभेद विसरून सर्वांनी हेल्मेट सक्तीविरोधात रस्त्यावर उतरावे. सर्वसामान्य नागरिकांनीही कृती समितीला पाठिंबा देत सक्तीविरोधी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.----------------------

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीस