शहरं
Join us  
Trending Stories
1
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
2
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
3
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
4
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
5
बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत
6
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
7
'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं
8
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
9
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
10
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
11
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
12
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
13
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
14
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
15
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
16
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
17
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
18
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
19
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
20
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ

जेजुरीत अतिक्रमणावर कारवाई सुरूच

By admin | Published: July 09, 2015 2:10 AM

तीर्थक्षेत्र जेजुरीतील पालखी महामार्गावरील अतिक्रमणे हटवण्याची धडक मोहीम आजही सुरू होती. मंगळवारी महामार्गाच्या डाव्या बाजूची सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली होती

जेजुरी: तीर्थक्षेत्र जेजुरीतील पालखी महामार्गावरील अतिक्रमणे हटवण्याची धडक मोहीम आजही सुरू होती. मंगळवारी महामार्गाच्या डाव्या बाजूची सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली होती, आज उजव्या बाजूची अतिक्रमणे हटवण्यास सकाळपासूनच सुरूवात झाली. अतिक्रमणे व्यवसायीक स्वत:हून हटवित होते. यामुळे कारवाई जलदगतीने होत होती. मात्र एसटी बस स्थानकासमोरील झोपडपट्टीतील अतिक्रमणे हटवताना तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी झोपडपट्टीतील महिला व पुरुषांसह जेजुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला होता. यामुळे काही वेळ कारवाई थांबली होती. जेजुरी पोलीस ठाण्यात प्रांताधिकारी समीर शिंगटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता विजयकुमार ठुबे, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्याशी या वेळी चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत कारवाई होणारच आहे. झोपडपट्टीतील अतिक्रमणे स्वत:हून हलवावीत असे प्रांताधिकारी शिंगटे यांनी सांगितले. चर्चेतून झोपडपट्टीतील अतिक्रमणे स्वत:हून काढण्याची तयारी रहिवाशांनी दर्शवली. त्यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आल्याची माहिती शिंगटे यांनी दिली. त्यानंतर कारवाई सुरूच होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे हटवण्यात आल्याने रस्ता मोकळा झाला आहे. जेजुरीतील अतिक्रमणे चुकीच्या पद्धतीने हटवण्यात येत आहेत. अतिक्रमणे काढण्यासंबधीच्या लेखी पूर्व सूचना देण्यात आल्या नव्हत्या, या अन्यायी कारवाईचा निषेध करीत गेल्या पन्नास वर्षांपासून या ठिकाणी व्यवसायिक राहत आहेत, अनेक रहिवाश्यांची घरे ही पाडण्यात आलेली आहेत. त्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्यांची झालेले नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जेजुरी शहर कॉँग्रेस, जेजुरी शहर व नागरी हक्क समिती तसेच व्यापारी संघटनेकडून करण्यात आली आहे. तसे निवेदन कॉँग्रेसचे नगरसेवक हेमंत सोनवणे, तसेच राहुल मंगवाणी, उमेश गायकवाड, राहुल दोडके, विशाल भोसले आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विजयकुमार ठुबे यांना दिले आहे. जेजुरी शहरातील अतिक्रमणे हटवण्याच्या धडक मोहिमेचे स्वागत नागरिकांतून होत असून सर्वच अतिक्रमणे हटवून शहराला एक नवीन ओळख निर्माण करून द्यावी, अशी मागणी ही ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)एकीकडे स्वागत, तर दुसरीकडे नाराजीएकीकडे या कारवाईचे स्वागत होत आहे, तर दुसरीकडे प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील अनेक अतिक्रमणे ही आजी-माजी नगरसेवक वा पदाधिकाऱ्यांची असूनही त्यांनी सहकार्य केल्याची माहिती अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिक्रमणे हटवन्यात आल्यानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्यानंतर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याची ही माहिती मिळाली.