लोणी काळभोर : पुणे - सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाका ते शेवाळेवाडी येथे अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करून तीन वाहने ताब्यात घेतली आहे. सुमारे १२ ब्रास वाळू या कारवाईमध्ये जप्त करण्यात आली आहे. थेऊरचे मंडल अधिकारी चंद्रशेखर दगडे, उरुळी कांचनचे मंडल अधिकारी दिपक चव्हाण यांनी शनिवारी (दि.२जून) दुपारी महसूल पथकाच्या मदतीने बाहनांवर कारवाई केली. ऊरुळी कांचन व थेऊरचे मंडलाधिकारी यांच्यासह तलाठी योगिराज कनिचे, श्रीकृष्ण भगत, अशोक शिंदे, कोतवाल अविनाश वाघमारे, दशरथ वघरे, शेखर चव्हाण, जीवन म्हस्के यांनी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने अडवली. त्या वाहनचालकांकडे कोणतेही शासकीय चलन आढळून आले नसल्यामुळे संबधित तीन वाळूचे ट्रक पुढील दंडात्मक कारवाईसाठी हवेली प्रांताधिकारी कार्यालयात पाठवले आहे. एका वाहनांमध्ये अंदाजे चार ब्रास वाळू याप्रमाणे तीन वाहनांमध्ये १२ ब्रास वाळू असल्याचे दिसून येते. प्रतिब्रास ३७ हजार ९०० रुपये दंड व शास्तीची रक्कम असा एकूण अंदाजे ८ लाख रुपये दंड वसूल होण्याची शक्यता वर्तविली जाते................... प्रतिब्रास ३७ हजार ९०० रुपये अनधिकृत वाळू वाहतूकीसाठी दंड आकारला जात आहे. प्रत्येक वाहनांस शास्तीच्या रक्कमेचा दंड व वैयक्तिक त्याच किंमतीचा जातमुचलका घेतल्यानंतर संबधित वाहनांतील गौणखनिज ताब्यात घेऊनच वाहने सोडली जातील. याकामी कारवाई करण्याचे आदेश संबधिताना बजावलेले आहेत. ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी हवेल
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 6:35 PM
जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीचे प्रमाण वाढले असून यावर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.
ठळक मुद्देएका वाहनांमध्ये अंदाजे चार ब्रास वाळू याप्रमाणे तीन वाहनांमध्ये १२ ब्रास वाळू प्रतिब्रास ३७ हजार ९०० रुपये दंड व शास्तीची रक्कम असा एकूण अंदाजे ८ लाख रुपये दंड वसूल होण्याची शक्यता