शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

वडगाव निंबाळकर पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 1:37 AM

नऊ जणांवर गुन्हा दाखल : १ लाख ३ हजार रुपयांचा माल जप्त

वडगाव निंबाळकर : वडगाव निंबाळकर पोलिसांनी शनिवारी (दि. १५) सायंकाळी पाचच्या सुमारास अवैध धंद्यावर धडक कारवाईकेली. यामध्ये दोन ठिकाणी मटक्यावर, दोन अवैध दारू विक्रेत्यासह, तर एका जुगार अड्ड्यावर छापा टाकत रोख रकमेसह,एक दुचाकी असा एकूण एक लाख ३ हजार ३६५ रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

वडगाव निंबाळकर येथील बाजारतळावर जुगार अड्डा चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे आपल्या सहकाऱ्यांबरोबर शहानिशा करण्यासाठी गेले होते. यावेळी चंद्रकांत घोडेकर, रघुनाथ लोणकर, अकबर भालदार, विजय शिंदे, सिकंदर भालदार, स्वप्निल झगडे (सर्व रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) पैशावर पत्ते खेळताना आढळून आले. सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्याकडे रोख १ हजार १७५ रुपयांसह बुलेट (एमएच ११ सीए ७७७६) दुचाकी मिळून आली. पोलिसांनी सर्व माल जप्त केला आहे. दुसरी कारवाई येथील माळीवस्ती परिसरात चालवल्या जात असलेल्या मटका अड्ड्यावर केली. येथील मारुती मंदिराजवळ शिवाजी साळवे याला मटका चिठ्ठी फाडताना पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक हजार १४५ रुपयांसह मटका, जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले आहे.कोºहाळे बुद्रुक येथील बाजारतळावर सयाजी चव्हाण(रा. समतानगर कोºहाळे बुद्रुकता. बारामती) याला मटका चिठ्ठ्या फाडताना पकडले आहे. एकहजार १४५ रुपयांसह मटका साहित्य ताब्यात घेतले. मुढाळे येथीललाला खोमणे याला बेकायदा देशी दारू विकताना पकडले, याच्यावरगुन्हा नोंदवला आहे....छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरूवडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाºया जवळपास सर्वच गावांमध्ये छुप्या पद्धतीने मटका, जुगार, अवैध दारूधंदे सुरू आहेत. हद्दीतील सोमेश्वरनगर या ठिकाणी सर्वात मोठ्या प्रमाणावर मटका व्यवसाय सुरू आहे. सोशल मीडियाच्या जगात आता मटका खेळणारे ही मटक्याची चिठ्ठी फाडायला जाण्यापेक्षा मटका लावण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. याकडेही पोलिसांनी वेळेत लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी