Rohit Pawar: आयकर विभागाची कारवाई राजकीय हेतूनेचं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 01:17 PM2021-10-10T13:17:57+5:302021-10-10T13:18:18+5:30
आयकर विभाग (income tax department) कोणाच्याही घरी छापेमारी करू शकते. मात्र यामध्ये राजकीय हेतू नसावा, असे मत आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
बारामती: उगाचच राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी अशी छापेमारी केली जात असेल तर ही चुकीची बाब आहे. आपल्या कुटूंबीयांना त्रास होत असेल तर ही गोष्ट कोणालाही आवडत नाही. आयकर विभाग (income tax department) कोणाच्याही घरी छापेमारी करू शकते. मात्र यामध्ये राजकीय हेतू नसावा, असे मत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
बारामती येथे रविवारी एका कार्यक्रमानंतर आमदार रोहित पवार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील आयकर विभागाची छापेमारी कोणावरही होत असते. मात्र कुटूबियांना त्रास दिला जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र ही छापेमारी उगीचच त्रास देण्याच्या हेतूने नसावी. सध्या राज्य आर्थिक संकटात आहे. केंद्राकडून अपेक्षीत निधी मिळत नसताना महाविकास आघाडी (mahavikas aghadi) सरकार अतिवृष्टीच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अद्याप त्या भागातील पंचनामे पूर्ण होत आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू, असा शब्द दिला आहे. राज्यसरकारमधील जबाबदार व्यक्ती ज्यावेळी असा शब्द देते तेंव्हा कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मला वाटतो.
बोटीवर १०० - १५० मुलामुलींपैकी ठराविक लोकांनाच का पकडले, रोहित पवारांचा सवाल
आर्यन खान (aryan khan) ड्रग्स् प्रकरणावर भाष्य करताना आमदार रोहित पवार म्हणाले, ग्रामविकास मंत्री नवाब मलिक यांनी जो मुद्दा मांडला तो आधी समजून घेतला पाहिजे. ज्या बोटीवर शंभर दिडशे मुलेमुली होत्या त्यातील ठराविक लोकांनाच का पकडले. इतरांना कशाच्या आधारावर सोडले. तसेच या प्रकरणी कारवाई करतान भाजपचे पदाधिकारी कसे काय उपस्थित होते, असे प्रश्न कोणाही सर्वसमान्य नागरिकाला पडणार. ड्रग्स् घेणारा कोणीही असो कारवाई होत असेल तर सर्वांना समान न्याय द्यायला हवा. यातून नेमका काय संदेश देणार आहात, असा सवाल देखील रोहित पवार यांनी यावेळी केला. तसेच नितेश राणे यांना काय म्हणायचे आहे तेच मला कळत नाही, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.