पुणे : शासनाच्या आदेशानुसार डाळी, खाद्यतेल आणि खाद्य तेलबियांची साठेबाजी व काळाबाजाराला आळा घालण्यासाठी कारवाई सुरू राहणार आहे. यापुढे दुकानांबरोबरच मॉल आणि प्रोसेसिंग मिलवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी दिली.कारवाईमुळे गुलटेकडी मार्केट यार्ड आणि भवानी पेठेतील व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. परंतु ही साठेबाजांची तपासणी असून, दोषी आढळणाऱ्यांवरच कारवाई करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी स्पष्ट केल्याने व्यापाऱ्यांनी तपासणीस सहकार्य करण्याची भूमिका घेतली. सोमवारी रात्री उशिरा कारवाई सुरूकरण्यात आली. रात्री साडेदहाच्या सुमारस मार्केट यार्ड आणि भवानी पेठेतील दुकाने बंद असल्याने या दुकानांना सील ठोकावे लागले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यापारी संतप्त झाले. रात्री करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात सकाळी मार्केट यार्ड परिसरात व्यापाऱ्यांनी पुरवठा विभागाच्या कारवाईस विरोध केला. बाजार बंद ठेवण्याची भूमिका घेतली. त्यानंतर पुन्हा मर्चंट चेंबरच्या सभागृहात व्यापाऱ्यांची सभा घेण्यात आली. चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी या कारवाईला विरोध केला.या सभेनंतर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी चेंबरच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ही कारवाई नसून शासनाच्या आदेशानुसार केवळ साठा निर्बंध आदेशाची तपासणी करत आहोत. रात्री सील करण्यात आलेली दुकाने सकळी पुरवठा विभागाच्या उपस्थितीत उघडण्यात आली. मार्केट यार्ड येथील १४५ घाऊक व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये साठामर्यादेचे उल्लंघन झाले असल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर ूजीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.या बैठकीनंतर चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांची भेट घेऊन कारवाईच्या विरोधात निवेदन दिले.(प्रतिनिधी)खाद्य व राज्य वखार महामंडळावर निर्बंधघाऊक व्यापाऱ्यांपाठोपाठ शहर आणि जिल्ह्यातील मॉल, डाळ मिल आणि डाळप्रक्रिया प्रकल्प यांच्याही तपासण्या केल्या जाणार आहेत, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले. खाद्य महामंडळ आणि राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये असणाऱ्या डाळी आणि तेलाच्या साठ्यांवर निर्बंध आणण्यात आले असून, परवानगी शिवाय त्याची उचल करू नये असे आदेश महामंडळांना देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
मॉल आणि प्रोसेसिंग मिलवरही कारवाई
By admin | Published: October 21, 2015 1:11 AM