पुणे : हवेले घोटाळा (धनदा कॉर्पोरेशन) प्रकरणात संबंधिताची सर्व मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विधानसभा अधिवेशनात सांगितले. आमदार मेधा कुलकर्णी यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.पुण्यातील सुमारे ४ हजार सामान्य नागरिकांना लुबाडण्यात आलेला हा सुमारे ३०० कोटी रुपयांचा घोटाळा आहे. महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध कायद्यानुसार जिल्हाधिकाºयांना ज्यांनी फसवणूक केली आहे, त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्याचा आधार घेत हवेले यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी होत असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे आमदार कुलकर्णी यांनी अधिवेशनात निदर्शनास आणले. सरकारने यात लक्ष घालावे, संबंधितांची मालमत्ता जप्त करावी व सामान्य नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यावर, यात सरकार लक्ष घालेल व हवेले यांची सर्व मालमत्ता जप्त करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करेल, असे स्पष्ट केले.
हवेले घोटाळा प्रकरणात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:31 AM