याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंचर - भीमाशंकर रस्त्याच्या कडेला डोंगरे हॉस्पिटलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत लिंबाचे झाडाच्या शेजारी आडोशाला आशिश काजबे हा कल्याण मटका नावाचा जुगार पिंटू शेवाळे (रा. लांडेवाडी, ता. आंबेगाव) याचे सांगण्यावरून चालवत होता. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याबाबतची तक्रार पोलीस शिपाई संगीता मधे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय जढर करत आहे.
घोडेगाव पोलीस स्टेशनचे दबंग सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनचा पदभार घेऊन एक महिना होत आला आहे. पदभार घेतल्यापासून अवैध दारुधंदे, मटका, जुगार, कत्तलीसाठी जनावरांचा वापर यावर मोठमोठाले कारवाई केल्या आहेत .यामुळे अवैद्य धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.