नीरा : आज नीरा येथील आठवडे बाजारदिवशी विविध ठिकाणी बेफिकीर व बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली.भोर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या निर्भया पथकाने बेशिस्त वाहन चालवणाºया रोडरोमिओंवर ही धडक कारवाई केली. जेजुरी पोलिसांनी निर्भया पथकाला सहकार्य केले.मागील काही दिवसांपासून नीरा शहरात रोडरोमिओंचा उपद्व्याप वाढले आहेत. शाळा, महाविद्यालय सुटताना युवक बेदरकारपणे वेगात दुचाकी पळवत असतात. एसटी बस स्थानक तसेच शाळेच्या मार्गावर नीरा व परिसरातील युवक टोळक्याने छेडछाडीच्या उद्देशाने उभे असलेले दिसतात.बुधवारी दुपारी भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या सूचनेनुसार निर्भया पथकाच्या कर्मचाºयांनी कारवाई केली. या कारवाईत निर्भया पथकातील कांचन आडसूळ, हेमा म्हेत्रे, मंदाकिनी वायदंडे या महिला कर्मचारी सहभागी होत्या.जेजुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश माळेगावे, सुदर्शन होळकर, सचिन तांदळे, पोलीसपाटील भास्कर जाधव यांनी निर्भया पथकाला सहकार्य केले.शाळा व महाविद्यालयात तक्रार पेटी असावी, अशी मागणी मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थिनींनी केली होती. त्या वेळी तक्रार पेटी शाळेच्या आवारात बसवली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दीड वर्ष झाले तरी तक्रार पेटी नसल्याने विद्यार्थिनी नाराजी व्यक्त करीत आहेत.विनापरवाना वाहन चालवणाºया, लोकवस्तीमधून भरधाव वेगाने वाहन चालवणारे, दुचाकीवरून दोनपेक्षा अधिक लोकांची वाहतूक करणे, सायलेन्सरची पुंगळी काढून कर्णकर्कश आवाजात मोटारसायकल चालवणे, शाळेच्या सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत रस्त्याने छेडछाडीच्या उद्देशाने वाहन चालवणाºयांवर कडक कारवाई करण्यात येईल, त्यामध्ये लहान-मोठा भेदभाव केला जाणार नाही. त्यामुळे लोकांनी कायद्याचे काटेकोर पालन करावे. पालकांनीही मुलांना परवाना नसताना वाहने देऊ नयेत. दिल्यास अशा पालकांनाही कारवाईस सामोरे जावे लागेल.- राजेश माळेगावे, पोलीस उपनिरीक्षक, जेजुरी
नीरेत रोडरोमिओंवर कारवाई, जेजुरी पोलिसांचे निर्भया पथकाला सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 2:23 AM