शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाइकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
5
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
6
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

अपंग निधी खर्च न करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:23 AM

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सभापती संजय भोसले यांची भेट घेतली. या वेळी तालुक्यातील काही ग्रामसेवक ग्रामपंचायतीस येणारा ३ टक्के

बारामती : अपंगांसाठी ग्रामपंचायतीचा आलेला निधी जी ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक खर्च करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहोत; तसेच याबाबत कोणत्याही अपंग व्यक्तीची तक्रार असले, तर त्यांनी पंचायत समितीमध्ये सभापतींच्या नावे अर्ज द्यावा, संबंधित अर्जाची दखल तातडीने घेण्यात येईल, अशी माहिती बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी दिली.

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पदाधिकाºयांनी सभापती संजय भोसले यांची भेट घेतली. या वेळी तालुक्यातील काही ग्रामसेवक ग्रामपंचायतीस येणारा ३ टक्के अपंग निधी खर्च करीत नाहीत; तसेच याबाबत पाठपुरावा केल्यास संबंधित अपंग व्यक्तीस नाहक त्रास देण्यात येतो, अशा तक्रारी केल्या. हा अपंग निधी जागतिक अपंग दिनापर्यंत खर्च न केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर दि. ३ डिसेंबरला आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या पदधिकाºयांनी दिला. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान सभापती भोसले यांनी आपण स्वत: याचा पाठपुरावा करू, कोणी ग्रामसेवक अथवा ग्रामपंचायत पदाधिकारी अपंग निधी खर्च करण्याबाबत आडकाठी आणत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासनदेखील भोसले यांनी दिले. अपंग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग हक्क कायद्याची तालुक्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीदेखील संघटनेच्या पदाधिकाºयांनी केली. या वेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धमेंद्र सातव, तालुकाध्यक्ष मृत्युंजय सावंत, अजित काटे, रवींद्र चांदगुडे, दीपक शिंदे, हरिभाऊ जाधव आदी उपस्थित होते.शासनाकडून अपंग व्यक्तीला घरकुल, व्यावसायिक गाळे व इतर अनेक योजनांचा लाभ दिला जातो. मात्र, काही ग्रामसेवक हेतुपुरस्सर अपंग व्यक्तींची अडवणूक करतात. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया लोखंडे यांनी केली. यावर सभापती भोसले यांनी संबंधित पीडित अपंग व्यक्तीने आपल्या नावे पंचायत समितीकडे तक्रार करावी. त्या तक्रारीची मी स्वत: दखल घेऊन चौकशी करेन. अपंग व्यक्तींना अपमानास्पद वागणूक देणाºयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही भोसले यांनी सांगितले. 

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणे