शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

रिक्षाचालकांवर कारवाई

By admin | Published: October 06, 2016 3:26 AM

गाडीतळ आणि गांधी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गणवेश, बॅच व परवाना नसलेल्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई

हडपसर : गाडीतळ आणि गांधी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गणवेश, बॅच व परवाना नसलेल्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाल्याने नागरिक आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.गाडीतळ चौकात ज्या रिक्षाचालकांकडे बॅच, गणवेश, परवाना नाही आणि वाहतुकीला अडथळा ठरत आहेत, अशा ठिकाणी उभ्या केलेल्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई झाली. वाहतूक सुरळीत होण्यासाठी रिक्षाचालकांबरोबर इतरही वाहनचालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे, असे पोलिसांनी सांगितले.हडपसर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस हवालदार आनंद कांबळे, सुनील बोरकर, पोलीस शिपाई दीपक कांबळे आणि महिला पोलीस शिपाई श्यामल सातपुते यांनी १५ रिक्षांवर कारवाई केली. गाडीतळ चौकात तीनआसनी रिक्षाचालकांचे अनधिकृत सात रिक्षातळ असून, त्यातील तीन अनधिकृत आहेत. अधिकृत असलेल्या ठिकाणी तीन-चार रिक्षा उभ्या करण्यासाठी परवानगी आहे; मात्र तेथे १० ते १५ रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. अशा रिक्षाचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.नियम पाळा, अपघात टाळा४झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर स्टॉपलाइनवर थांबा व पादचाऱ्यांचा आदर करा, लाल दिवा लागल्यानंतर थांबा, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे टाळा, सिटबेल्ट, हेल्मेटचा वापर करा आणि अ‍ॅम्ब्युलन्सला प्राधान्याने रस्ता मोकाळा करून द्या असे साधे नियम वाहन चालविताना पाळून आणि संयम ठेवून पुण्याच्या संस्कृतीची ओळख वाढवू या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.गाडीतळ मध्यवर्ती ठिकाण४हडपसरगाव आणि परिसरातील नागरिक तसेच बाहेरगावाहून येणाऱ्यांसाठी प्रमुख ठिकाण म्हणून गाडीतळ ओळखले जाते. पूर्र्वी या ठिकाणी बैलगाड्या थांबत होत्या त्यावरून या ठिकाणाला गाडीतळ असे नाव पडले आहे. त्यानंतर या ठिकाणी जकात नाका सुरू केला होता. आता या ठिकाणी पीएमपीचा बसथांबा आणि पोलीस ठाणे आहे.उड्डाणपुलाचे नियोजन चुकले४गाडीतळावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुलाचे नियोजन केले. सुरुवातीला आकाशवाणी ते वैदूवाडी चौकदरम्यान पाच किलोमीटर लांबीचा आणि सासवडकडे एल, तसेच मगरपट्टा चौकातही एल अशी रचना होती. मात्र, हा पूल अवघा ९०० मीटर झाला आणि वाहतूककोंडी सुटण्याऐवजी जटिल बनली. त्यानंतर मगरपट्टा चौकात आणि गाडीतळावर उड्डाणपुलावर दोन पूल उभारले. मात्र, अद्यापही गाडीतळावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.