शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पीएमपीच्या १२ बसेसवर आरटीओची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 7:31 PM

पीएमपीच्या मालकीच्या तसेचे ठेकेदारांकडील बसच्या स्थितीबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या जातात.

ठळक मुद्देमागील काही महिन्यांत बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ मागील महिनाभरात १२ बसला योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्याची नोटीस

पुणे : आगीच्या घटना तसेच प्रवाशांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालया (आरटीओ) ने पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या बसची तपासणी सुरू केली आहे. मागील महिनाभरात १२ बसला योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे या बस मार्गावरून बंद करण्यात आल्या आहेत.पीएमपीच्या मालकीच्या तसेचे ठेकेदारांकडील बसच्या स्थितीबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या जातात. आसनांची दुरावस्था, काटा फुटलेल्या, अग्निशमन यंत्र, प्रथमोपचार पेटी नसणे तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव अशा अनेक तक्रारींचा दररोज पाऊस पडतो. तसेच मागील काही महिन्यांत बसला आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत. काही बसच्या वायरींग, बॅटरी जळत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. बस रस्त्यावरच सुरू ठेऊन चालक अन्यत्र जाण्याचे प्रकारही समोर येत आहेत. काही दिवसांपुर्वी कात्रज येथे अशीच सुरू ठेवलेली बस अचानक उतारावरून पुढे गेल्याने काही वाहनांना धडकली. एका वाहनाला अडल्यामुळे अनर्थ ठळला. मात्र, त्यानंतरही असे प्रकार समोर येत आहेत. याबाबतही आरटीओकडे प्रवाशांकडून तक्रारी केल्या जात आहेत. देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाणही अधिक आहे. आरटीओ पुरेशा मनुष्यबळाचा अभाव असल्याने मार्गांवरही वाहनांची तपासणी करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातही पीएमपी बसची तपासणी होत नव्हती. पण तक्रारी वाढल्याने मागील महिन्यापासून आरटीओने बसची तपासणी सुरू केली. याअंतर्गत शहरात विविध रस्त्यांवर बसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १२ बस सुस्थितीत नसल्याचे आढळून आले. प्रामुख्याने बसमधील फाटलेली, तुटलेली आसने, वायरींगमधील दोष तसेच अग्निशमन यंत्र नसणे या गोष्टी प्रकषार्ने जाणवल्या. तसेच इतर आवश्यक सुविधाही नव्हत्या. त्यामुळे याबाबत आवश्यक दुरूस्ती करून बस मार्गावर आणण्याबाबत पीएमपी प्रशासनाला नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे मार्गावरील या १२ बस बंद करण्यात आल्याची माहिती आरटीओतील अधिकाऱ्यांनी दिली.------------------पीएमपी बाबत आलेल्या तक्रारींनुसार मागील महिन्यापासून तपासणी सुरू करण्यात आली आहे. दोष आढळलेल्या बस मार्गावरून बंद करण्यात येत आहेत. पुढील काळातही ही कारवाई सुरू राहील. प्रवाशांनी याबाबत आरटीओकडे तक्रारी कराव्यात.- विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलRto officeआरटीओ ऑफीसNayana Gundeनयना गुंडे