शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

वाळू वाहतूकदारांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 1:18 AM

पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी गावच्या हद्दीतील शेवाळेवाडी येथे अवैध वाळू विक्री होत असलेल्या होलसेल मार्केटवर महसूल पथकाने बुधवारी (दि. २४) सकाळी धाड टाकून कारवाई केली.

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी गावच्या हद्दीतील शेवाळेवाडी येथे अवैध वाळू विक्री होत असलेल्या होलसेल मार्केटवर महसूल पथकाने बुधवारी (दि. २४) सकाळी धाड टाकून कारवाई केली. कारवाईमध्ये वाळूचे दहा ट्रक महसूल पथकाने ताब्यात घेतले आहेत. मात्र, यावेळी वाहनचालकांनी वाहनांच्या चाव्या काढून पोबारा केल्याने महसूलने ताब्यात घेतलेली वाहने पुढील कार्यवाहीसाठी प्रांत कार्यालयात नेताना महसूल पथकाची चांगलीच दमछाक झाली.हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी स्वत: महसूल पथकासमवेत थांबल्याने महसूल पथकाचे मनोधैर्य उंचावले आहे. हवेलीमध्ये अवैधपणे वाळूउपसा व वाहतूक होत असल्याचे निर्दशनास आल्याने हवेलीचा नव्याने पदभार स्वीकारलेले तहसीलदार सुनील कोळी यांनी अवैधपणे गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या माफियांचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. महसूलचा दंड व आरटीओ विभागाचाही दंड आकारून पुढील कार्यवाही होणार आहे.हडपसरच्या मंडलाधिकारी तेजस्विनी साळवेकर, थेऊरचे मंडलाधिकारी चंद्रशेखर दगडे, उरुळी कांचनचे मंडलाधिकारी दीपक चव्हाण यांच्यासमवेततलाठी शिवाजी देशमुख, श्रीकृष्ण शिरसाट, मधुकर भांबळे, गणेश सुतार, दिलीप पलांडे, योगिराज कनिचे, गोकुळ भगत, अर्चना वणवे, प्रदीप जवळकर, कोतवाल नामदेव शिंदे, सुरेश तंगाडे, रवी घुले, संतोष तंगाडे, दशरथ वगरे, रतन हिंगणे, अविनाश वाघमारे, अनिल महाडिक, जीवन म्हस्के, गौतम गायकवाड या महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई केली आहे. जिल्ह्णातील दौंड, इंदापूर तालुक्यामधून, तसेच सोलापूर व अहमदनगर जिल्ह्णातील काही भागांतून पुणे शहराकडे व उपनगरात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळू विक्रीसाठी येत असते. मंडलाधिकारी, तलाठी व कोतवाल सातबारा संगणकीकरणाच्या कामामध्ये कित्येक महिने व्यस्त असल्याने अवैधपणे वाळूउपसा व वाहतूक करणाºया माफियांचे फावले आहे.>कारवाईमध्ये दहा वाळूची वाहने ताब्यात घेतली असून ती वाहने हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारात जमा करणार आहोत. प्रत्येकी वाहनात सुमारे चार ब्रास वाळू असून कोणत्याही वाहनधारकाकडे शासकीय चलन आढळून आले नाही. या कारवाईमधून अंदाजे ३५ लाखांचा महसूल शासनाला जमा होणार आहे. शासकीय चलनाद्वारे दंड वसूल केल्यानंतर हमीपत्र घेऊनच कायदेशीर बाबी तपासल्यानंतर वाहने सोडली जाणार आहेत.- सुनील कोळी, तहसीलदार, हवेलीजकातनाका ते मांजरी बाजार समिती यादरम्यान या वाळूचे ट्रक वाळू भरून रात्रीच्या वेळी येऊन थांबतात. पहाटेपासून ११ वाजेपर्यंत गरजवंत येथे येतात. व्यवहार ठरला की ती वाळू खाली करण्यासाठी ट्रक रवाना होतात.पाचपट दंंडासहित प्रतिब्रास २ लाख रुपये शास्तीची रक्कम असा प्रतिट्रकवर ३ लाख ५० हजार दंड होणार आहे. ३५ लाख रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहेत. परिवहन विभागही या ट्रकवर दंडात्मक कारवाई करणार आहे.