शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना तर्डोबावाडी येथील घोड नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना कळली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे, पोलीस निरीक्षक बिरदेव काबुगडे, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सुनील मोटे, पोलिस नाईक संजू जाधव, अनिल आगलावे, करणसिंग जारवाल, प्रवीण पिठले, तुकाराम गोरे यांच्या पथकाने रात्री गस्तीदरम्यान तर्डोबावाडी येथे चार ठिकाणांहून अवैधरीत्या वाळू उत्खनन करून जेसीबीच्या साह्याने हायवा ट्रकमध्ये तीन ब्रास वाळू भरून वाहतूक करणाऱ्या चार ट्रक करडे, न्हावरा व तर्डोबावाडी येथे पकडून ट्रकसह ४५ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात चार केलेल्या कारवाईनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.
तर्डोबाची वाडी येथे वाळू ट्रकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:13 AM