टाकळी हाजी : परिसरात महसूल विभागाने वाळूतस्करांवर कारवाई करून सात वाळू ट्रक पकडले. तहसीलदार रणजित भोसले, सह नायब तहसीलदार डी. के. जाधव, मंडल अधिकारी रमेश वाल्मीकी, पी. एम. गोसावी, बी. व्ही. कावळे, एस. आर. नलावडे, प्रमोद लोखंडे हे या पथकामधे सहभागी झाले होते. शिक्रापूर येथे पाच ट्रक, तर आमदाबाद येथून दोन ट्रक जप्त करण्यात आले.टाकळी हाजी परिसरात अवैध वाळूउपशाबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिले होते. याची दखल घेऊन महसूल विभागाने ही कारवाई केली. प्रत्येक ट्रकमधून जवळपास ४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. शिरूर परिसरातही या प्रकारची कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
टाकळीहाजी येथे वाळूतस्करांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 1:16 AM