पुणे : कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्व नियोजित कट होता. त्यामुळे संबंधित घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा समन्वय समितीतर्फे शनिवारी करण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या १० जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भारिप बहुजन महासंघाचे मा. ना. कांबळे, राहूल मखरे, विकास साळवे, दत्ता पोळ, राजेंद्र गायकवाड, किरण शिंदे, रमाकांत खंडे आदींचा समावेश होता. या समितीतर्फे येत्या सोमवारी (दि. २२) पोलीस अधिक्षकांना अहवाल दिला जाणार आहे.धेंडे म्हणाले, की स्थानिक व परिसरातील नागरिकांशी समितीने संवाद साधला. फोटो, व्हिडीओ आणि आॅडिओ समितीने जमा केले. त्यातून हा पूर्व नियोजित कट होता. कट्टर हिंदुत्ववादी संघाने हा हल्ला घडवून आणला होता. हल्ला झाल्यानंतर दंगल उफाळून आली होती. मात्र, सध्या केवळ दंगल झाल्यानंतरचा तपास सुरू आहे. हल्ल्याचा कट करणाऱ्यांना अटक करावी तसेच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून या घटनेचा तपास करावा.
कोरेगाव भीमा येथील घटनेतील दोषींवर कारवाई करावी, समन्वय समितीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 6:28 PM
कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्व नियोजित कट होता. त्यामुळे संबंधित घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा समन्वय समितीतर्फे शनिवारी करण्यात आली.
ठळक मुद्देसामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या १० जणांची समन्वय समितीस्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून या घटनेचा तपास करावा : डॉ. सिद्धार्थ धेंडे