पुणे : कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायाेमेट्रीक यंत्रणा सुरु करणाऱ्या महाविद्यालयांची यादी जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून करण्यात अाली अाहे. तसेच ही यंत्रणा सुरु न करणाऱ्या महाविद्यालयांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा संबंधित महाविद्यालयांविराेधात तसेच शिक्षणाधिकाऱ्यांविराेधात अाक्रमक अांदाेलन करण्यात येईल असा इशाराही मनविसेकडून देण्यात अाला अाहे.
मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून त्यात बायाेमेट्रीक यंत्रणा सुरु न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी केली अाहे. कनिष्ठ महाविद्यालयातील (विज्ञान शाखा) विद्यार्थी नियमीत वर्गात उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात. तसेच नियमीत वर्गाएेवजी काेचिंग क्सासेसमध्ये उपस्थित राहतात. अनेक महाविद्यालयांनी याकरीता खासगी शिकवणी वर्गासाेबत सांमजस्य करार केला अाहे. महाविद्यलयातील विद्यार्थी शिकवणी वर्गात उपस्थित राहतात व नियमित वर्गांना अनुपस्थित राहतात अशा अनेक स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या अाहेत. या करारांमुळे क्लासेस व महाविद्यालयांकडून विद्यार्थी-पालकांची अार्थिक लुट हाेत अाहे. या संदर्भात शासनाने कनिष्ठ महाविद्यलयांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती बायाेमेट्रीक पद्धतीने सुरु करण्याकरीता अावश्यक यंत्रसामुग्री शासन निर्यय निर्गमित झाल्यापासून एक महिन्याच्या अात उपलब्ध करण्याचे निर्देश महाविद्यलयांना दिले अाहेत. तरीसुद्धा बहुतांश महाविद्यलयांमध्ये बायाेमेट्रीक यंत्रणा बसविलेली नसल्याचे खात्रीशीर दिसते. त्यामुळे या महाविद्यलयांची तपासणी करण्यात यावी. असे पत्रात लिहिण्यात अाले अाहे.