१० हजारांचा दंड केला वसूल : २०० किलो प्लॅस्टिक जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत प्लास्टिकबंदी मोहीम प्रमाण राबवण्यासाठी भोर नगरपालिका प्रशासनाने शहरात विविध प्रकारे अमंलबजावणी चालू आहे. शहरात विविध दुकानांत, आस्थापनांत छापे टाकून प्रशासनाने प्लास्टिक जप्त करत १० हजारांचा दंड वसूल केला आहे. तर २०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
शहरातील प्लास्टिक पुरवठादार यांचा शोध घेऊन प्रशासनाने चौपाटी रोड येथे कारवाई केली. या कारवाई अंतर्गत प्लास्टिक कचरा व्यवस्थापन कायद्यानुसार सुमारे १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सुमारे २०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. राहुल दादा दुर्गाडे व स्वरूप संजय लंबाते यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त कापडी पिशव्यांचा वापर करून प्लास्टिकमुक्त पर्यावरणाकडे वाटचाल केली पाहिजे. ५० मायक्रॉनपेक्षा अधिक प्लास्टिकचा वापर केला पाहिजे. नगरपालिकेच्या पथकात महेंद्र बांदल, रत्नदीप पालखे, अभिजित सोनवले, पवन भागणे, स्मिता गोडबोले, राजेंद्र राऊत, किशोरी फणसेकर, रत्नमाला नाशिककर यांनी ही कारवाई केली.