विमाननगर : ‘गरिबांना उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटलचा धिक्कार असो. रुग्ण हक्क अधिकाराचा विजय असो,’ अशा घोषणा देत रुग्ण हक्क परिषद, पुणे शहराच्या वतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयावर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.धर्मादाय रुग्णालयांनी आढेवेढे न घेता तातडीने उपचार सुरू करावेत, बिलाचे पैसे भरण्याची पात्रता नसल्यास मृतदेह अडवून ठेवू नये, मृतदेह अडवणाºया हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच बंडगार्डन रस्त्याच्या हॉस्पिटलवर दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागण्या सहआयुक्त धर्मादाय नवनाथ जगताप यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आल्या.या वेळी रुग्ण हक्क परिषदेच्या नेत्या अॅड. वैशाली चांदणे व राज्य अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनामध्ये शहराध्यक्ष दत्ता सुरते, कार्याध्यक्ष डॉ. आनंद कांबळे, कार्याध्यक्ष तेजश्री पवार, शहरसचिव समीर वाव्हळे, शहर उपाध्यक्ष सुधीर गडवीर, सरचिटणीस संध्या चौरे, संगीता सोनवणे, सोनाली बढे, नितीन शिंदे, साधना मिसाळ, मुकुंद गायकवाड, सुजाता गुरव, रमेश म्हस्के आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पैशामुळे १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यूअनामत रक्कम भरली नाही म्हणून बंडगार्डन रस्त्याच्या एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये येरवडा येथील १२ वर्षांच्या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. अशा पद्धतीच्या घटना खासगी व धर्मादाय रुग्णालयांमध्ये वारंवार घडताना दिसतात.अनामत रक्कम सक्तीने मागणाºया धर्मादाय रुग्णालयावर कारवाई करावी व तातडीने उपचार सुरू करावेत, या प्रमुख मागणीसाठी रुग्ण हक्क परिषदेच्या नेत्या अॅड. वैशाली चांदणे व राज्य अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली.
पैशासाठी उपचार नाकारणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 2:53 AM