पिंपरी : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड वाल्हेकरवाडी येथे आयोजित केलेल्या विचारवेध प्रशिक्षण कार्यक्रमास महिला आणि तरूण कार्यकत्यांची अनुपस्थितीबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. ‘‘आओ जावो, घर तुम्हारा चालणार नाही. निष्क्रिीय कार्यकर्त्यांवर कारवाई करणार आहे. याच काय आणि त्याच काय? हे आता मी ऐकुण घेणार नाही. तसेच मेरीट असणाºयांनाच महापालिका निवडणूकीत संधी देणार आहे, सत्ताधारी भाजपाच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवा, तसेच पक्षसंघटना मजबूत करा, असेही मार्गदर्शन पवार यांनी केले. शहरातील प्रमुख नेत्यांची हजेरीही घेतली.
पिंपरी-चिंचवड शहर राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या विचार वेध प्रशिक्षण वाल्हेकवाडीत झाले. यावेळी विविध माध्यमप्रतिनिधींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ नेते छगन भूजबळ, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, आझम पानसरे, संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर, योगेश बहल, नाना काटे, प्रशांत शितोळे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख तसेच आजी माजी महापौर पदाधिकारी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात उद्घाटनाच्या वेळी अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘गेली पाच वर्षे भाजपाने भूलथापा देऊन लूट केली आहे. सत्ताधारी भाजपाने केवळ भ्रष्टाचार केला असून एकही ठोस असे काम केलेले नाही. त्यास कारणीभूत दिशाहीन नेतृत्व आहे. पाणीपुरवठा, संतपीठ, अर्बनस्ट्रीटच्या कामांत गैरव्यवहार केले आहेत. पुढील काळात शंभर घोटाळे काढणार आहोत. ’ समारोपाच्या सत्रात अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच पदाधिकाºयांचे कान टोचले. पवार म्हणाले, ‘‘तीन विधानसभा मतदार संघातून महिला आणि तरूणांची उपस्थिती कमी असल्याचे दिसून येत आहे. ही बाब गांभिर्याने घ्यायला हवी. पिंपरीतील महिलांची बैठक झालीच नाही. निरीक्षकही दिले आहेत. जुण्या-नव्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे. तसेच विद्यार्थी संघटनेनेही गांभिर्याने घ्यायला हवे. तसेच आजी माजी पदाधिकाºयांनी नगरसेवकांनी अॅक्टिव्ह व्हायला हवे. जो काम करीत नसेल त्याला बदलले जाईल. चुकीच्या कामाविरोधात होणाºया आंदोलनातही महिलांचा सहभाग कमी आहे. ही बाब चांगली नाही.’’दादांनी घेतली हजेरीअजित पवार यांनी भाषणात स्थानिक नेत्यांची हजेरी घेतली. कानही टोचले. पवार म्हणाले, ‘राजू मिसाळ, डब्बू आसवानी कुठे आहेत.’’ त्यावर उपस्थितांमधून लग्न किंवा अन्य कार्यक्रमांना गेल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यावर पवार म्हणाले, ‘बघा नक्की लग्नालाच गेलेत का अन्य कोठे? याबाबत अध्यक्षांनी मला माहिती द्यावी.