दुकानदार, नागरिकांनी मास्क वापरावा, सॅनिटायजरचा वापर करावा, गर्दी करू नये व कोरोना नियम काटेकोर पालन पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बी. जे. एस. कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक यांची बैठक झाली. त्याचबरोबर ग्रामपंचायत वाघोली येथेही सदस्य व नागरिकांची जनजागृतीपर बैठक झाली. या बैठकीस तहसीलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वर्षा गायकवाड, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य रामकृष्ण सातव पाटील, विस्तार अधिकारी मोरे, वाघोलच्या सरपंच वसुंधरा उबाळे, ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार, केसनंदचे ग्रामविकास अधिकारी गणेश वालकोळी, डॉ. नागसेन लोखंडे यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
***************************
गेल्या पंधवड्यात वाघोली आणि परिसरात रुग्णांची संख्या वाढली आहे. याकरिता आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली असून कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे. यासाठी आणखी एका नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याची मागणी करण्यात आली असून तपासणीसाठी दोन डॉक्टर, एक फार्मासिस्ट, दोन आरोग्यसेविका, डाडा एन्ट्री ऑपरेटर, चार शिपाई अशी यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे
ज्ञानेश्वर कटके, जिल्हा परिषद सदस्य
******************
कोरोना सेंटर बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याची लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासकीय स्तरावर दखल घेऊन बीजेएस येथील कोविड सेंटर लवकरच सुरू करण्यात येईल, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.