पुणे: पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीत यंदाही डीजेचा दणदणाट, डोळ्याला त्रासदायक लाईटस बेसुमार वापर करण्यात आला होता. पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे काही मंडळांकडून उल्लंधन करण्यात आले. या गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आल्या आहेत. मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर ज्यांनी लेसर वापरले त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा इशारा आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषेदत दिला आहे.
कुमार म्हणाले, पुणे शहरात गणपती विसर्जन मिरवणूक ३ वाजता संपल्या आहेत. अंदाजे २८ तास मिरवणूक शांततेत पार पाडली. पोलिसांनी विना अडीअडचणी मिरवणूक पार पडली. मोठा जनसमुदाय या मिरवणुकीत सहभागी झाला होता. आम्ही लेसर बाबत बंदी घातली होती. ज्यांनी लेझर वापरले असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा कुमार यांनी दिला आहे. ध्वनिवर्धक आवाजाच्या मर्यादेबाबतही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. मोबाईल चोरी घटना कमी घटना घडल्या आहेत. त्या सर्व बाबत कारवाई करून चोऱ्या उघडकीस आणणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. महिला सुरक्षा बाबत पोलिसांनी उत्तम काम केलं. त्यात काही घटना घडल्या असतील तर त्यावर ही कारवाई करू अशी ते म्हणाले आहेत. पुणेकरांचे आणि बाहेरून आलेल्या सर्व गणेश भक्तांचे आभार त्यांनी यावेळी मानले आहेत.
मध्यरात्री बारानंतर डीजे चा आवाज शांत झाला पण, पारंपारिक ढाेलताशांचा निनाद सूरू असल्याने त्या ठेक्यावर तरूण - तरूणींनी ताल धरला. संपूर्ण रस्त्यावर तरूणाईची गर्दी प्रचंड असल्याने संपूर्ण लक्ष्मी रस्ताच तरूण झाल्याचे या विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळाले. तसेच किशाेरवयीन आणि मुलांचीही संख्या ब-यापैकी दिसून आली.