तळेघर : एकतीस डिसेंबर निमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसरामध्ये दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवरती कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप पवार यांनी दिली.
नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वच जण उस्तूक असतात परंतु काही तरुणांचा जोश तर खूपच वेगळा तरुणाईला उधान येऊन एका वेगळ्या दिशेने जात हे तरुण एका आगळ्या वेगळ्या स्वरुपाने हा उत्साह साजरा करत असतात पर्यटन त्याच प्रमाणे निसर्ग रम्य परिसरामध्ये जावुन मद्य प्राशन करुन डिॅल्बी डि.जे. लाऊन धांगडधिंगाणा घालणे या सारखे प्रकार घडतात याला श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसर कसे अपवाद ठरेल परंतु याला जबर चाप बसवत घोडेगाव पोलिस स्टेशनचे व वनपरिक्षेत्र भीमाशंकर अभयारण्य यांच्याकडून दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर कडक कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई कडून कोणतेही गाल बोट लागू नये यासाठी प्रशासन सज्ज झाले असून दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवरती दोन्ही विभागाच्या वतीने संयुक्तीकरित्या कडक कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचे घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप पवार व वनपरिक्षेत्र भीमाशंकर अभयआरण्य वनपाल एन. एच. गिऱ्हे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
--
घोडेगाव पोलिस स्टेशनच्या वतीने ३१ डिसेंबर रोजी जुन्नर फाटा डिंभा तळेघर म्हतारबाचीवाडी या ठिकाणी चेक नाके बनविण्यात येणार असून गाड्या तपासल्या जाणार आहेत तर डिंभे धरण परिसर व इरतत्र भागामध्ये पोलिस व्हॅनद्धारे पेट्रोलिंग केली जाणार आहे. सार्वत्रिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे ही सतर्क करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे ब्रिथऑनालायझरद्धारे तपासणी केली जाणार आहे. वनपरिक्षेञ भीमाशंकर अभयआरण्य वन्यजिव विभागामार्फत म्हातारबाचीवाडी येथील वनविभागाचा नाका श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे वन कर्मचाऱ्यांकडून जंगलामधून पेट्रोलिंग केली जाणार आहे तर म्हतारबाचीवाडी या ठिकाणी असणारा वनविभागाचा चेक नाक्यावरती गुरुवारपासून गाड्या चेक करुन श्री क्षेत्र भीमाशंकरला पाठविण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र भीमाशंकर अभयआरण्य वनपाल एन. एच. गिऱ्हे यांनी सांगितले.