इंदापूर : जलसंपदा विभाग ठाण्याचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक गिरीश बाबर यांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे कायदा-सुव्यवस्था विभागाचे सहायक पोलीस महासंचालक अविनाश अंबुरे व महाराष्ट्र राज्याचे गृहसचिवांनी दिले आहेत.गिरीश् बाबर यांनी केलेल्या कथित गैरव्यवहाराबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसंदर्भात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग टाळाटाळ करीत असल्याने बाबर व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करावी व त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी रिपाइंचे पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांनी दि. २७ सप्टेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनानंतर हे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, गिरीश बाबर यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवाजीराव मखरे यांनी केली आहे. जलसंपदा विभाग ठाण्याचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक बाबर यांनी त्यांच्या सेवाकाळात फार मोठ्या प्रमाणात या विभागात भ्रष्टाचार केला असल्याचा मखरे यांचा दावा आहे.
'त्या' अधिकाऱ्यावर होणार कारवाई
By admin | Published: October 12, 2016 2:40 AM