पुणे: पुण्यात बालेवाडीत आज भाजपचे अधिवेशन सुरु आहे. गृहमंत्री अमित शाह हे या अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारा आहेत. यावेळी महाराष्ट्रातून भाजपचे नेते उपस्थित राहिले आहेत. यावेळी उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. आता विरोधक बॅटिंग करू लागले आहेत. प्रत्येकाला मैदानात उतरून जोरदार बॅटिंग करायची आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनीही कुठल्याच आदेशाची वाट ना पाहता विरोधकांना ठोकून काढा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
फडणवीस म्हणाले, आज गुरुपौर्णिमा आहे. भगवा ध्वज आपला गुरु आहे, हा ध्वज शिवाजी महाराजांचा आहे. त्याचा आपण मान राखला पाहिजे. २०१३ ला आपण असच अधिवेशन घेतलं आणि १४ निवडून आलो. या विधानसभेला महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार मी लिहून देतो. हा भाजपचा विचार गावपर्यंत पोहोचवणावर आहे. २०१९ च्या निवडणुकीत लोकांचा पाठिंबा बघितला, २०१४ लाही जनता आपल्या पाठीशी होती. २०१४ ची निवडणूक ती पक्षांविरोधात लढत होतो. फेक नॅरेटिव्ह ला आम्ही ताकद दाखवणार आहोत. आपला परावभ ०.३ टक्क्याने झाला. आपल्या १७ आणि त्यांच्या ३१ जागा आल्या आहेत. आता फक्त थोडी मेहनत करण्याची गरज आहे. त्यावेळी फेक नॅरेटिव्ह येत होता. त्याला उत्तर देऊ शकलो नाही. म्हणून कमी जागा आल्या आहेत.
आरक्षणाची सीमा वाढवण्याचा प्रयत्न अटलजींनी केला. मोदींनी देखील सीमा वाढवली. संविधानाचे आरक्षण सामान्य माणसासाठी आहे. संविधान बदलणार हा फेक नॅरेटिव्ह चालवण्यात आला. आवास योजना, मेट्रो, जल शिवार युक्त योजना त्यांनी बंद केल्या. आम्ही लाडकी बहीण योजना सुरु केली. बहिणीचा सन्मान करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या विरोधात ते कोर्टात चालले. आपली योजना आहे ती जमिनीवर उतरली पाहिजे. महाविकास आघाडीचे लोक आहेत. चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून घेतले जात आहेत. आपल्याला हि योजना अंमलात आणायची आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्म भरा. आपल्या कार्यकर्त्यांनी लोकांना मदत करा.
सिलेंडरच्या किमती वाढल्या हा एक खोटा नॅरेटिच त्यांनी पसरवला. आपल्याविरुद्ध नरेटीव्ह तयार होतो, पण आपले लोक उत्तर देत नाहीत. आपले लोक उत्तर देत नाहीत, आदेशाची वाट बघतात. मी आज आदेश देतो, फुल बॅटिंग करा, आदेश विचारू नका, मैदानात उतरा आणि ठोकून काढा. फक्त बोलताना आपली हिट विकेट पडू देऊ नका, असे आवाहनच फडणवीसांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलं आहे