पुणे ; 'काय म्हणतात पुणेकर, निवडून आलाय मुरलीधर ' अशा शहरात ठिकठिकाणी लागलेल्या फ्लेक्सद्वारे पुणे लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाची कार्यकर्त्यांना शंभर टक्के खात्री होती. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोहोळ यांच्यासाठी खास भगव्या रंगाचा भाजप फेटा मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे ऑर्डर देऊन तयार करवून घेतला आहे. नवनिर्वाचित खासदार मोहोळ यांच्या विजयानंतर त्यांच्या डोक्यावर या भगव्या फेट्याचा साज चढविला जाणार आहे.
पुणे लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये ख-या अर्थाने चुरस होती. ध्ंगेकर आणि मोहोळ यांच्यामध्ये कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार? याबाबत पुणेकरांना निश्चितपणे सांगता येणे कठीण होते. पण भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांना मुरलीधर मोहोळ हेच खासदारपदी निवडून येणार याची सुरुवातीपासूनच खात्री होती. त्यामुळे दोन दिवस अगोदरच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोहोळ यांच्या विजयासाठी खास भाजप फेटा तयार करण्याची आँर्डर दिली होती. त्यानुसार हा फेटा तयार करण्यात आला असून, निकालाच्या दिवशीच खासदार मुरलीधर मोहोळ यांना कार्यकर्त्यांकडून हा फेटा परिधान केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती मुरुडकर झेंडेवाले चे गिरीश मुरुडकर यांनी दिली.
फेटयाची वैशिष्ट्ये
* हा फेटा उन्हाळ्याच्या दृष्टीने काँटनचा आणि कमी वजनाचा बनविण्यात आला आहे.* फेट्यावर कमळाचा खड्याचा ब्रूच लावण्यात आला आहे.* फेट्यावर पैठणीची हिरवी जरी लावण्यात आली आहे. ज्यायोगे भाजपचा भगवाकलर उठून आणि भरजरी दिसावा.