या उपक्रमामध्ये ऑनलाईन ७/१२ चूक दुरुस्ती, वारसनोंद , ७/१२ वरील बोजा कमी करणे, एकरार नोंदी करणे, नवीन शिधापत्रिका, शिधापत्रिकेत नाव दाखल करणे, दुबार शिधापत्रिका, मतदान कार्ड, भूमिहीन शेतकरी प्रमाणपत्र, शेतकरी दाखला, मुख्यमंत्री कोरोना सहाय्यता योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, महावितरण योजना, वय अधिवास दाखला, अल्पभूधारक दाखला, पी. एम. किसान योजना, उत्पन्नाचा दाखला, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड, अतितीव्र अपंग व्यक्तींना निर्वाह भत्ता देणे, अनु-जाती /जमाती दाखला, इतर मागास प्रवर्ग दाखला, विमुक्त जाती दाखला आदी दाखल्यांसाठी अर्ज भरून व त्यास लागणारे कागदपत्रे जोडून देण्यात आले. शुक्रवारी माले, दिसली, अकोले, कळमशेत येथे तर शनिवारी कोंढावळे, चिंचवड, बेलावडे, खेचरे या ठिकाणी हा उपक्रम झाला. उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, भोर विधानसभा मतदार संघटक प्रकाश भेगडे, शिवसेना महिला आघाडीच्या स्वाती ढमाले यांच्या शुभ हस्ते झाले. या वेळी तालुकाप्रमुख सचिन खैरे, युवासेना तालुका अध्यक्ष संतोष तोंडे, गोविद सरुसे, हनुमंत सुर्वे, दत्ता झोरे, विष्णू ढोरे, अनिल अधवडे, संतोष अधवडे, मयूर जाधव, विजय दळवी, दिलीप गुरव, प्रशात जोरी, बाळू जोरी, हनुमंत ठकोरे आदी उपस्थित होते. माहिती युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे यांनी दिली.
मुळशीत शासन आपल्या दारी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:14 AM