शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

... म्हणून पुणे पदवीधर व शिक्षकची प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यास दुपारी तीन वाजणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 7:52 PM

पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास अंतिम निकालाला शुक्रवारचे पाच वाजतील.. 

पुणे : पुणे विभाग विधान परिषद पदवीधर मतदार संघात ४ लाख २६ हजार २५७ मतदारांपैकी २ लाख ४७ हजार पन्नास (५७.९६टक्के ) मतदारांनी मतदान केले,तर शिक्षक मतदार संघात ५२ हजार ९८७ म्हणजेच ७३. ०४ टक्के मतदारांनी मतदान केले आहे

एकूण मतदानाची वाढलेली टक्केवारी, एकूण उमेदवारांची संख्या यामुळे पाचही जिल्ह्याची मतपत्रीका एकत्र करणे, त्यातून वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करणे,त्यानंतर पहिल्या पसंती क्रमांकात निवडून येण्यासाठी मतांचा कोटा निश्चित करून प्रत्यक्ष पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू करण्यासाठी गुरूवारी(दि.3) दुपारचे तीन ते चार वाजणार आहेत. तर पहिल्या फेरीत एखाद्या उमेदवाराने मतांचा कोटा पूर्ण न केल्यास उलट्या क्रमांने पसंतची मते मोजावी लागतील व मतदानाची प्रक्रिया खूपच लांबून अंतिम निकाला हाती येण्यासाठी शुक्रवारचे पाच वाजतील अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी सांगितले. 

पदवीधर मतदार संघासाठी ६२ उमेदवार असल्याने ही मतपत्रिका जम्बो झाली. त्यामुळे मतपत्रिका हाताळण्यासाठीही विलंब लागणार आहे. शिक्षक मतदारसंघासाठी ३५ उमेदवार आहेत. पदवीधर साठी ४ लाख २६ हजार २५७ मतदारांपैकी २ लाख ४७ हजार पन्नास मतदारांनी मतदान केले असून ५७.९६टक्के मतदान झाले आहे. शिक्षक मतदार संघ ७२ हजार ५४५ मतदारांपैकी ५२ हजार ९८७ म्हणजेच ७३. ०४ टक्के मतदारांनी मतदान केले आहे. पहिल्या टप्प्यात वैध आणि अवैध मतपत्रिका वेगवेगळ्या केल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल.

बालेवाडी येथील स्टेडियममध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली असून , पदवीधर साठी ११२ आणि शिक्षक मतदार साठी ४२ टेबल लावले आहेत. मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदारसंघासाठी १८ हॉल, तर शिक्षक मतदारसाठी ६ हॉल आहेत. पदवीधरसाठी १२६ पर्यवेक्षक, २५२ सहायक आणि १२६ शिपायांची नेमणूक करण्यात आली. 'शिक्षक मतदार'साठी ४२ पर्यवेक्षक, ८४ सहायक आणि ४२ शिपायांची नियुक्ती करण्यात आली. सुरक्षेसाठी ४५० पोलिस आहेत. अशी माहिती देशमुख यांनी दिली.-------मतपत्रिकांचे वजन १४ टन. पदवीधर साठी ६२ उमेदवार रिंगणात आहेत त्यासाठी जम्बो मतपत्रिका तयार करण्यात आली. एका केंद्रावर आठशे ते एक हजार मतदारांची व्यवस्था होती. त्यासाठी मतपत्रिकांचा गठ्ठा देण्यात आला त्याचे वजन ३२ ते ३५ किलो झाले. पदवीधर साठी एकूण ४ लाख २६ हजार मतपत्रिका छापण्यात आल्या त्यांचे एकूण वजन १४ टन झाले. मतपत्रिकांचा ची घडी घालण्यासाठी खास कर्मचारी नेमण्यात आले. मतपत्रिकेची घडी मतपेटीत घुसण्यासाठी या घडीला विशिष्ट आकार देण्यात आला होता.-----

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकVotingमतदानResult Dayपरिणाम दिवसcollectorजिल्हाधिकारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMNSमनसे