आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने व प्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले आहे. यातून नदीवरील पाणीसाठवण के.टी. वेअर बंधाऱ्याची गळती व साठवण बंधारे तुटलेल्या अवस्थेत आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी पाणी साठवण क्षमतेवर मर्यादा आल्याने आळंदीत इंद्रायणी नदी कोरडी पडली आहे.आळंदी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर भाविक श्रींच्या मंदिरात दर्शनासह तीर्थक्षेत्रातील स्नान महात्म्य जोपासण्यास येतात. आळंदीतून इंद्रायणी नदी वाहते. मात्र नदीत थेट सांडपाणी सोडले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतूनदेखील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीत सांडपाणी व रसायन, मैलामिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. यामुळेदेखील आळंदी नदीचे प्रदूषण वाढले आहे. वाढत्या जलप्रदूषणाने अलंकापुरीत भाविक व नागरिकांमधूनदेखील नाराजी व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षाने आळंदी परिसरातील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. नदीतील जलप्रदूषित करणाºया घटकांवर कारवाईच्याअभावी नदी प्रदूषण आळंदीसह नदीच्या परिसरात वाढले आहे. आळंदीला पाणीपुरवठा केंद्रात येणारे पाणीदेखील प्रचंड प्रदूषित असल्याने आळंदी नगर परिषदेस पाणी शुद्धीकरणावर प्रचंड खर्च सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांत नाराजी आहे. आळंदी परिसरात दूषित पाण्याच्या समस्येने भाविक नागरिकांना नाहक जास्त खर्च करून पिण्याचे बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. आरोग्याची काळजी घेत नागरिकही स्वच्छ पिण्याचे पाण्यास प्राधान्य देत भुर्दंड सोसत आहेत.नगर परिषदेने नागरिक भाविकांना स्वच्छ तसेच पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करता यावा, यासाठी राज्य शासनाकडे थेट भामा-आसखेड ते आळंदी या दरम्यान बंदनलिकेतून पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली. प्रस्तावाप्रमाणे स्कीमला मंजुरी मिळाल्यास काही महिन्यांतच प्रभावीपणे काम करून आळंदीकरांसह राज्य परिसरातून येणाºया भविकांना शुद्ध पाणी पुरवठ्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास मुख्याधिकारी भूमकर यांनी व्यक्त केला आहे.शहरातून पिण्याच्या पाण्याचे वितरण नलिकांसह पाण्याच्या टाक्यांची कामे देखील झाली आहे. उर्वरित कामे लवकरच होतील. याशिवाय सांडपाणी नलिकांची कामे सुरु आहेत. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. काही कालावधीत तीर्थक्षेत्र आळंदीच्या चेहरामोहरा बदललेला भाविक, नागरिकांना पाहण्यास मिळेल. मात्र सुरु असलेल्या कामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. शहरात सध्या काही ठिकाणी एकेरी मार्ग वाहतूक सुरु आहे. सुरक्षिततेसाठी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कामकाज सुरु आहे. यासाठी पिंपरी महापालिकेने डी.पी.आर.देखील तयार केला आहे. राज्य शासनस्तरावर देखील यासाठी काम सुरु आहे.महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षाने आळंदी परिसरातील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. नदीतील जलप्रदूषित करणाºया घटकांवर कारवाईची मागणी केली.>पाणीही प्रदुषितपाणीदेखील प्रचंड प्रदूषित असल्याने आळंदी नगर परिषदेस पाणी शुद्धीकरणावर प्रचंड खर्च सहन करावा लागत आहे. भाविक नागरिकांना नाहक जास्त खर्च करून पिण्याचे बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. आरोग्याची काळजी घेत नागरिकही स्वच्छ पिण्याचे पाण्यास प्राधान्य देत भुर्दंड सोसत आहेत.
अलंकापुरीत इंद्रायणीला प्रदूषणाचे ग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 2:00 AM