पुणे : आपल्या कार्यक्षेत्रात येणा-या गावांमध्ये विशेष उपक्रम राबवून गावांचा विकास करणाºया जिल्ह्यातील पाच रणरागिणींबरोबर एकूण १४ जणांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली. ही निवड मागील दोन वर्षांतील कामांचा आढावा घेऊन करण्यात आली आहे.हवेली, बारामती, इंदापूर, मुळशी आणि मावळ या पाच तालुक्यातील प्रत्येकी एका महिला ग्रामसेवकाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे, तर इतर तालुक्यातील पुरुष ग्रामसेवकांचा समावेश आहे.जिल्ह्यात स्वच्छता मोहीम, ग्रामपातळीवर वसुली आणि जमाखर्च या घटकांकडे विशेष प्राधान्य देऊन निश्चित कार्यक्रम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये विशेष काम करणाºया तसेच तालुक्यातील इतर गावांमध्ये सक्षम ग्रामसचिवालय बनविणाºया जिल्ह्यातील १४ ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सन २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षांत मासिक सभा, पंचायत समिती सभा उपस्थिती, लेखापरीक्षण, बायोगॅस कामास प्राधान्य देणाºया ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.या पुरस्कारामध्ये आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी गावचे ग्रामसेवक रवींद्र रामचंद्र उगले यांची निवड आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.गावातील बंदिस्त गटारे, समाजकल्याण विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या कामांची अंमलबजावणी करणाºया ग्रामसेवकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ग्रामसेवकांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.- संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदजिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १४ ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये सन २१०४-१५ मधील एक आदर्श ग्रामसेवकाचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या कामांना उत्तेजन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मागील काही वर्षांपासून प्रोत्साहन देण्यासाठी हा विशेष सन्मान करण्यात येत आहे. आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी प्रशासनाच्या वतीने ग्रामपातळीवर विविध योजना आणि निकष लावून काम करणाºया ग्रामसेवकांचे मूल्यांकन तपासण्यासाठी १०० गुणांच्या तक्त्याच्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे.
पाच रणरागिणींना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, जिल्ह्यातील एकूण १४ जणांचा होणार विशेष सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 3:38 AM