पुणे : एमआयटीच्यावतीने ८ व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन दि. १९, २० व २१ जानेवारी दरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांना मैत्रेयी पुरस्काराने तर खासदार सुस्मिता देव यांना गार्गी पुरस्काराने गौरवियात येणार आहे.आठव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन शुक्रवारी होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड, शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, सिनेअभिनेत्री मनीषा कोईराला, खासदार दुष्यन्त चौटाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती छात्र संसदेचे प्रमुख निमंत्रक प्रा. राहुल कराड यांनी दिली. यावेळी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास, अधिष्ठाता डॉ. आर. एम. चिटणीस, संचालिका डॉ. सायली गणकर उपस्थित होते. विविध पक्षातील १२ तरुण आमदारांचा सत्कार केला जाणार आहे. छात्र संसदेचा समारोप २१ जानेवारी रोजी होणार आहे.
नवीन पटनाईक यांना आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 5:38 AM