बारामतीकरांच्या चिंतेत भर; आठ दिवसांत सापडले तब्बल २१३ कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 02:37 PM2021-02-25T14:37:36+5:302021-02-25T14:38:19+5:30

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत प्रशासन अधिक सतर्क झाले आहेत.

Add to Baramatikar's concern; As many as 213 corona inffected patients were found in eight days | बारामतीकरांच्या चिंतेत भर; आठ दिवसांत सापडले तब्बल २१३ कोरोनाबाधित

बारामतीकरांच्या चिंतेत भर; आठ दिवसांत सापडले तब्बल २१३ कोरोनाबाधित

googlenewsNext

बारामती: दिवसेंदिवस वाढत्या कोराना रुग्णांच्या संख्येने बारामतीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या आठ दिवसांत बारामती शहर आणि तालुक्यात २१३ कोरोनाबाधितांची भर पडली आहे.तर गेल्या  २४ तासात बारामती परिसरात ३५ कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
गेल्या अडीच महिन्यात प्रथमच ३० पेक्षा अधिक रुग्ण सापडण्यास १८ फेब्रुवारीपासुन सुरवात झाली आहे. त्यानंतर कोरोनाचा आलेख वाढतच आहे.  त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध होण्याची, दक्षता घेण्याची गरज आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी आज गेल्या २४ तासातील  कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. यामध्ये बारामती शहरातील २३ आणि ग्रामीणमधील १२ रुग्णांचा समावेश आहे. अडीच महिन्यात प्रथमच रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांबरोबरच प्रशासन देखील धास्तावले आहे. बारामतीची आजपर्यंतची रुग्णांची संख्या ६,६७६ वर पोहोचली आहे. तर ६,२८३ रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आजपर्यंत एकूण १४५ जणांचा मृत्यू झाल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत प्रशासन अधिक सतर्क झाले आहेत. विशेष पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवली आहे. प्रत्येक चौकात असे नागरिक पोलिसांच्या रडारवर आहेत. आता विनामास्क फिरणाऱ्या महाभागांकडुन ५०० रुपये दंड आकारण्यास सुरवात झाली आहे. त्यातूनही काही महाभाग विनामास्क फिरताना दिसतात. नगरपालिका प्रशासनाने मास्क शिवाय दुकानात प्रवेश करू नये, असे फलक शहरातील प्रत्येक दुकानावर लावले आहेत. मात्र, दुकानांमध्ये येणाऱ्या  काही उदासीन नागरिकांकडून याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचा धोका स्पष्ट आहे.

Web Title: Add to Baramatikar's concern; As many as 213 corona inffected patients were found in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.