शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अतिरिक्त आयुक्त, तुम्ही सभागृहाबाहेर जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 5:16 AM

महापालिका शाळेतील मुलांना बसण्यासाठी बाकडे नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन स्थायी समितीने शिक्षण विभागाची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिका शाळेतील मुलांना बसण्यासाठी बाकडे नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन स्थायी समितीने शिक्षण विभागाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. किती शाळांना भेटी दिल्या याबाबत उत्तर न देऊ शकणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांना सभागृहाबाहेर जा, असा आदेश दिला. मात्र, आयुक्तांनी मध्यस्ती केल्याने सदस्य शांत झाले. आठ दिवसांत वस्तुस्थितीची माहिती देण्याचे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे नाहीत, स्वच्छतागृह नाही, पिण्यासाठी पाणी नाही, अनेक शाळेत शिक्षकांची वाणवा आहे. शाळांना मुख्याध्यापक नाहीत. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घसरत आहे, याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याबाबत मागील आठवड्यातील स्थायी समिती सभेत चर्चा झाली होती. अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी शाळांना भेऊ देऊन उपाययोजना करण्याचे सूचना स्थायी समितीनी केली होती. त्या वेळी मी आज शाळांना भेटी दिल्यावर उद्या समस्या सुटणार का? असे उलट उत्तर त्यांनी दिले होते. या असंवेदनशील पणाचा निषेध पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत पुन्हा या विषयांवर चर्चा झाली. स्थायी समिती सभेत अतिरिक्त आयुक्तांना आपण किती शाळांना भेटी दिल्या अशी विचारणा केली. त्यावर भेट न दिल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत व्यवस्थित उत्तरे दिले नाहीत. त्यामुळे स्थायी समितीने अतिरिक्त आयुक्तांना सभागृहाबाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. त्यामध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मध्यस्थी केली. महापालिका शाळेत किती शिक्षकांची कमतरता आहे. याचा अहवाल ८ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले. तसेच अतिरिक्त आयुक्तांनी स्थायी समितीच्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत, असे सावळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची हेळसांड खपवून घेणार नाही लोकमतमध्ये काही दिवसांपूर्वी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. असे वृत्त छायाचित्रासह प्रकाशित केले होते. याबाबत मागील सभेत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली होती. त्यांना उत्तरे देता आली नाही. या विभागाची जबाबदारी असणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांना उत्तरे देता आली नाही. अत्यंत असंवेदनशीलपणे, बेजबाबदारपणे उत्तरे दिली. पालिकेच्या शाळेत गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. त्या मुलांची हेळसांड करू नये. त्यांच्याकडे आस्थेवाईकपणे पाहणे गरजेचे आहे. सर्व सोयीसुविधा दिल्या गेल्या पाहिजेत, असे स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले.