वाडा : येथे वीज वितरणचे कार्यालय असून, परिसरातील अनेक ग्राहकांना विना रीडिंगची वाढीव बिले आकारली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांत संताप आहे. सुपेवाडी वाडा येथील काळूराम सुपे यांना अंदाजे बिलामुळे ७२४ युनिट वाढलेले आहेत. तर, असे बिल आकारल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात बिल आले आहे. शेतकरी येथील कार्यालयात फेऱ्या मारूनही त्यात सुधारणा होत नाही. वीज कनेक्शन तोडले जाते; त्यामुळे शेतकरी व ग्राहक त्रस्त आहेत. येथील कार्यालयांतर्गत भोरगिरी भिवेगाव, पाभे, वांजाळे, मोरोशी, खरोशी, शेंदुर्ली, डेहणे, गोरेगाव, सुरकुंडी, माजगाव, आव्हाट, वाळद, तिफनवाडी, वाडा, दरकवाडी, सुरकुलवाडी, सुपेवाडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी आदी ठिकाणे येतात. यात काही गावे नदीच्या अलीकडे व काही पलीकडे आहेत. वीज वितरणचे कर्मचारी कित्येक गावांमध्ये रीडिंग घेण्यासाठी फिरकतही नसल्याने प्रत्येक वेळी विना रीडिंगची अंदाजे बिले आकारली जातात. परिरातील शेतकऱ्यांना बिल दुरुस्तीसाठी सातत्याने फेऱ्या माराव्या लागतात. तरीही त्यात कुठल्याही प्रकारची सुधारणा होताना दिसत नाही. (वार्ताहर)
वाडा परिसरात जास्तीची वीजबिले
By admin | Published: October 10, 2014 6:26 AM