बारामती : बारामती येथील आदित्य निकने जेईई मेन २०२१ परीक्षेत देशात २३८३ वा क्रमांक मिळवत यश मिळविले. तब्बल १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२१ परीक्षा दिली.
आदित्य निकमने पहिल्याच प्रयत्नांत त्याने उल्लेखनीय निकाल मिळविला. आदित्य निकम याचे वडील कॉसमॉस बँकेत नोकरी करतात. त्यांची नेहमी दर तीन वर्षाला बदली होत असते. इयत्ता पहिली ते पाचवी तो कोल्हापूर इथे शिकल्यानंतर सहावी ते दहावी बारामतीमधील विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर मध्ये एसएससी बोर्डमधून दहावी उत्तीर्ण झाला. दहावीला त्याला ८६ टक्के मार्क्स होते. अकरावीसाठी त्याने आचार्य अकॅडमी दोन वर्षांच्या इंटिग्रेटेड कोर्ससाठी प्रवेश घेतला. अगदी पहिल्याच दिवसापासून चिकाटीने अभ्यास करायला सुरुवात केली. आदित्यची जिद्द, पालकांची जागरुकता व आचार्य ॲकॅडमी बारामती येथील प्राध्यापकांचे मार्गदर्शन या त्रिवेणी संगमातून त्याने हे उज्ज्वल यश संपादन केले असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या यशानिमित्त अकॅडमीचे संस्थापक संचालक ज्ञानेश्वर मुटकुळे, संचालक सुमित सिनगारे, संचालक कमलाकर टेकवडे, संचालक प्रवीण ढवळे यांनी आदित्यच्या यशाचे कौतुक केले.
—————————————————