यवत : व्हॉट्स अॅप या सोशल नेटवर्किंग साईटवरून आक्षेपार्ह मजकूर पाठवल्याप्रकरणी ग्रुपच्या अॅडमीनसह हा मजकूर पाठविणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली.ॠषिकेश भानुदास गायकवाड व अभिजित शंकर गायकवाड यांनी ‘स्वराज क्रिकेट क्लब’ नावाने व्हॉट्सअपवर ग्रुप तयार केला होता. सदर ग्रुपवर शुभम विजय जाधव (रा. केडगाव , ता. दौंड) याने विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा संदेश प्रसारित केला होता.साहील अब्दुल शेख (रा.यवत , ता.दौंड) याने सदर आक्षेपार्ह मजकूर पाहिल्यानंतर त्याने समीर सय्यद व अब्बास शेख यांना याची माहिती दिली. त्यांनी सदर माहिती यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शशीकांत चव्हाण यांना दिली. त्यांनी तत्काळ शुभम जाधव व अभिजित गायकवाड यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता शुभम जाधव याने सदर पोस्ट टाकल्याची कबुली दिली. त्यालाही अटक करूनल पोलिसांनी तिघांविरोधातही गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कांबळे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
अॅडमीन, पोस्ट टाकणा-याच्या विरोधात गुन्हा दाखल
By admin | Published: June 29, 2015 7:53 AM